Huawei SF5 Is The Smartphone Makers First electric Vehicle launched know price and more details
Huawei SF5: Smartphone तयार करणाऱ्या कंपनीनं बनवली पहिली Electric SUV; पाहा किती आहे किंमत By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 6:25 PM1 / 15जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये आता वाहन उत्पादकांव्यतिरिक्त तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्याही प्रवेश करत आहेत. 2 / 15दरम्यान, स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करणारी आघाडीची कंपनी Huawei नं बुधवारी आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही Huawei SF5 सादर केली. कंपनीने ही कार शांघाय ऑटो शोमध्ये लाँच केली.3 / 15Huawei ही चीनमधील एक कंपनी असून दूरसंचार उपकरणं आणि अन्य तंत्रज्ञानासाठी ती प्रसिद्ध आहे. 4 / 15Huawei आणि Cyrus नं मिळून ही कार तयार केली आहे. ही कार SERES या ब्रॅन्ड अंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाईल.5 / 15सध्या ही कार चिनी बाजारात लाँच करण्यात आली आहे. परंतु लवकरच ही कार अन्य बाजारांमध्येही उतरवली जाणार आहे.6 / 15या कारच्या साईजबद्दल सांगायचं झालं तर या कारची लांबी 4,700 mm, रुंदी 1,930 mm आणि ऊंची 1,625 mm आहे. याशिवाय या कारमध्ये 2,875 mm चा व्हिलबेस देण्यात आला आहे. 7 / 15या कारचं डिझाईनही अतिशय आकर्षक आहे. यामध्ये स्वेप्टबॅक हेडलाईटसोबत मेश ग्रिल आणि LED डे टाईम रनिंग लाईट्स देण्यात आले आहे. या कारचं स्लोपिंग रुफ लाईन कारच्या डिझाईनला अधिक आकर्षक बनवतं. 8 / 15Huawei च्या म्हणण्यानुसार या कारमध्ये देण्यात आलेलं 1.5 लिटर 4 सिलिंडर इंजिन एका जनरेटरप्रमाणे काम करतं, जे बॅटरीला पॉवर देतं. 9 / 15ही बॅटरी इलेक्ट्रीक मोटर्सशी जोडण्यात आलेली आहे. इलेक्ट्रिक मोटर आणि इंजिन मिळून एकूण 551PS ची पॉवर आमि 820Nm चा टॉर्क जनरेट करते. 10 / 15पिक-अपच्या बाबतीही ही कार जबरदस्त असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. केवळ 4.7 सेकंदात ही कार 0 ते 100 किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडू शकते. 11 / 15Huawei SF5 मध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आले आहेत. तसंच न्यू युरोपियन ड्रायव्हिंग सायकलनुसार ही कार 1000 किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते. 12 / 15एक्स्टेंडरचा वापर केल्यावरच इतकी ड्रायव्हिंग रेंज मिळणअयाची शक्यता आहे. केवळ इलेक्ट्रीकवर ही कार 180 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते. 13 / 15ही कार एखाद्या बॅटरीप्रमाणेही काम करते. याच्या सहाय्यानं टीव्ही किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेसना पॉवरही देता येते. 14 / 15कंपनीनं Huawei SF5 ही कार सध्या केवळ चिनी बाजारात सादर केली आहे. याची किंमत 2,16,800 युआन इतकी निश्चित करण्यात आली आहे.15 / 15कंपनीनं Huawei SF5 ही कार सध्या केवळ चिनी बाजारात सादर केली आहे. याची किंमत 2,16,800 युआन इतकी निश्चित करण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications