शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Hyundai Alcazar चं स्वस्त 7 सीटर डिझेल व्हेरिअंट झालं लाँच; मिळतंय 20 किमीचं मायलेज, पाहा फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 9:55 PM

1 / 5
Hyundai ने आपल्या प्रसिद्ध मिड साईज SUV Alcazar चे नवीन मिड-स्पेक्स व्हेरिएंट Platinum (O) भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. हे नवीन व्हेरिअंट केवळ डिझेल इंजिनसह विक्रीसाठी उपलब्ध असेल.
2 / 5
हे 7-सीटर व्हेरिअंट 6-सीटर व्हेरिअंटपेक्षा 15,000 रुपये स्वस्त आहे. सर्वात लक्षणीय, प्लॅटिनम (ऑप्शनल) एकमेव प्रकार आहे जो 6 आणि 7 सीट्स व्हेरिअंट्ससह उपलब्ध आहे. तसंच हे डिझेल इंजिन ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. ही एसयूव्ही एकूण दोन इंजिन पर्यायांसह 8 व्हेरिअंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
3 / 5
या कारच्या डिझेल व्हेरिअंटमध्ये कंपनीने 1.5 लिटर क्षमतेचे इंजिन वापरले आहे. जे 115PS पॉवर आणि 250Nm चा टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 2.0-लिटर इंजिन देण्यात आले आहे, जे 159PS पॉवर आणि 191Nm टॉर्क जनरेट करते.
4 / 5
हे इंजिन 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रांसमिशन गिअरबॉक्स सोबत येतं. यात इको, सिटी आणि स्पोर्ट सारखे ड्रायव्हिंग मोड्ससह स्नो, सँड आणि मडसारखे ट्रॅक्शन मोड्स देण्यात आले आहेत. आकर्षक लूक आणि मजबूत इंजिन क्षमतेसह येणाऱ्या या नवीन व्हेरिएंटची किंमत 19.63 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) निश्चित करण्यात आली आहे.
5 / 5
फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर 8 वे अॅडजेस्टेबल ड्रायव्हिंग सीट, 64 कलर अॅम्बिअंट लायटिंग, वॉईस ऑपरेटेड पॅनोरमिक सनरुफ, बोसची साऊंड सिस्टम. 10.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रूमेंट, 10.25 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटन्मेंट सिस्टम, ब्लुलिंक कनेक्टेड कार टेक्नॉलॉडी, अँड्रॉईड ऑटो, अॅपल कार सपोर्ट, पॅडल शिफटर, एअर प्युरिफायर, 360 डिग्री कॅमेरा आणि 8 स्पीकर्स देण्यात आले आहेत. ही कार 20.4 किमीचं मायलेज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
टॅग्स :Hyundaiह्युंदाईcarकारIndiaभारत