शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aura की Dzire: कोणती कार तुमच्यासाठी असेल बेस्ट? मायलेजपासून फीचर्सपर्यंत संपूर्ण डिटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 12:53 PM

1 / 9
दक्षिण कोरियन कार कंपनी Hyundai Motor ने सोमवारी ह्युंदाई ऑराचं (Hyundai AURA) चं फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केलं आहे. या कारमध्ये 30 हून अधिक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत 6,29,600 रुपये ठेवण्यात आली आहे.
2 / 9
ही कार पोलर व्हाइट, टायटन ग्रे, टायफून सिल्व्हर, स्टाररी नाईट (न्यू), टील ब्लू आणि फेयरी रेडमध्ये सादर करण्यात आले आहे. ही कार प्रामुख्याने बाजारात मारुती डिझायरला टक्कर देते, त्यामुळे या दोन सेडानपैकी कोणती कार तुमच्या बजेटमध्ये चांगली बसेल आणि कोणती कार बेस्ट आहे हे पाहू.
3 / 9
नवीन ऑरा फेसलिफ्टमध्ये 1.2L Kappa पेट्रोल इंजिन 5-स्पीड MT/AMT पर्यायासह देण्यात आले आहे. हे इंजिन 6000 rpm वर 83 PS पॉवर आणि 113.8 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. कारचे 1.2 लिटर बाय फ्युअल (पेट्रोल+सीएनजी) इंजिन 5 स्पीड एमटी ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. हे 6000 आरपीएमवर 69 पीएस पॉवर आणि 4000 आरपीएमवर 95.2 न्यूटन मीटर पिकअप टॉर्क जनरेट करते.
4 / 9
तर दुसरीकडे मारुती डिझायरमध्ये 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 90 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल स्टँडर्ड देण्यात आले आहे. याशिवाय, यात ऑप्शनल 5-स्पीड AMT गिअरबॉक्स देखील मिळतो. त्याच वेळी, हे इंजिन डिझायर सीएनजीमध्ये 77 PS पॉवर आणि 98.5 Nm टॉर्क जनरेट करते. डिझायरच्या CNG व्हेरियंटसोबत फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
5 / 9
ह्युंदाई ऑराच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 3.5-इंचाचा मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले, फूटवेल लाइटिंग, वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, 8-इंच स्क्रीन, स्टीयरिंग व्हील माउंटेड कंट्रोल्स आणि क्रूझ कंट्रोल तसेच पुश स्टार्ट/स्टॉप बटण देण्यात आलेय. तसंच यात तुम्हाला फर्स्ट-इन-सेगमेंट वायरलेस चार्जिंग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, TICE-C USB फास्ट चार्जर देखील मिळतो.
6 / 9
मारुती डिझायरमध्ये क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक एलईडी हेडलॅम्प्स, ऑटो फोल्डिंग ओआरव्हीएम, पुश बटन इंजिन स्टार्ट-स्टॉप आणि ऑटो एसी यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारी 7.0-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये 4.2-इंचाचा मल्टी-कलर MID डिस्प्ले यांसारखे फीचर्सही देण्यात आली आहेत.
7 / 9
नवीन Hyundai AURA मध्ये 6 एअरबॅगच्या पर्यायासह 4-एअरबॅग स्टँडर्ड (ड्रायव्हर, पॅसेंजर आणि साइड एअरबॅग्ज) मिळतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार या कारमध्ये 30 हून अधिक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये ESC (इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल), VSM (व्हेइकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट) आणि हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल (HAC) सारखे सेफ्टी फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. नवीन फर्स्ट-इन-सेगमेंट टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (हायलाइन) सह नव्या ऑरामध्ये बर्गलर अलार्म आणि ऑटोमॅटिक हेडलॅम्प दिलेले आहेत.मारुती डिझायरमध्ये क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक एलईडी हेडलॅम्प्स, ऑटो फोल्डिंग ओआरव्हीएम, पुश बटन इंजिन स्टार्ट-स्टॉप आणि ऑटो एसी यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारी 7.0-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये 4.2-इंचाचा मल्टी-कलर MID डिस्प्ले यांसारखे फीचर्सही देण्यात आली आहेत.
8 / 9
त्याच वेळी, मारुती डिझायरमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट अँकर आणि रियर पार्किंग सेन्सर यांसारखे फीचर्स सर्व व्हेरिअंटमध्ये स्टँडर्ड म्हणून देण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल होल्ड असिस्ट सारखे फीचर्स कारच्या AMT व्हेरिअंटमध्ये देण्यात आलेत. त्याचबरोबर टॉप मॉडेलमध्ये रियर व्ह्यू कॅमेरा आणि रिअर डिफॉगर सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. सेफ्टी म्हणून दिलेल्या एअरबॅगच्या बाबतीत Hyundai Aura अधिक चांगली आहे.
9 / 9
नवीन Hyundai AURA च्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 6.29 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही कार जवळपास 20-21 किमी प्रति लिटरचे मायलेज देते. त्याच वेळी, मारुती डिझायरच्या बेस व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 6.24 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारचे मायलेज 23 ते 24 किमी प्रति लिटर आहे.
टॅग्स :Hyundaiह्युंदाईMaruti Suzukiमारुती सुझुकी