लॉन्च होताच ग्राहकांची पसंती; नवीन Hyundai Creta चे 51 हजार बुकिंग, जाणून घ्या किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 16:43 IST
1 / 8 2024 Hyundai Creta Booking: गेल्या महिन्यात (जानेवारी 2024) आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाईने आपली बहुचर्चित Hyundai Creta फेसलिफ्ट लॉन्च केली. 2 / 8 लॉन्च होताच या गाडीला ग्राहकांची मोठी पसंती मिळाली. आतापर्यंत 51,000 पेक्षा जास्त बुकिंग या गाडीला मिळाले आहेत. ही नवीन SUV 3 इंजिन पर्यायांसह 7 ट्रिममध्ये उपलब्ध आहे. 3 / 8 यात 1.5L टर्बो पेट्रोल (160bhp), 1.5L पेट्रोल (115bhp) आणि 1.5L डिझेल (116bhp) चा समावेश आहे. शिवाय, याचे नवीन टर्बो-पेट्रोल इंजिन फक्त टॉप-एंड SX (O) व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत 20 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.4 / 8 याच्या 1.5 लिटर पेट्रोल NA मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 11 लाख ते 17.24 लाख रुपये आहे, तर पेट्रोल-CVT S(O), SX Tech आणि SX(O) व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 15.82 लाख रु., 17.45 लाख रु. आणि रु. 18.7 लाख रु. आहे. 5 / 8 डिझेल मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटच्या किंमती अनुक्रमे 12.45 लाख आणि 17.32 लाख रुपयांपासून सुरू होतात. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.6 / 8 Hyundai त्यांची स्पोर्टियर N Line व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, जे फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये बाजारात येण्याची अपेक्षा आहे. Hyundai Creta N Line ला N Line-स्पेसिफिक कॉस्मेटिक अपग्रेड आणि ट्यून्ड सस्पेंशन सेटअप मिळेल. 7 / 8 लीक झालेल्या पेटंट फोटोमध्ये वेगळ्या पद्धतीने डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल आणि बंपर दिसत आहे. याशिवाय, यात नवीन 18-इंच अलॉय व्हील्स आणि अपडेट साइड स्कर्टवर एन लाइन ब्रँडिंग असेल. 8 / 8 Creta N-Line मध्ये 160bhp, 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन आणि DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असू शकतो. मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायाचीही शक्यता आहे.