शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ह्युंदाईच्या नव्या CNG कारवरून पडदा उठला, ११ हजारांत बुकिंग; ६ एअरबॅग्स आणि भन्नाट फीचर्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:49 PM

1 / 6
ह्युंदाई मोटर्स भारतात Grand i10 Nios हॅचबॅकची फेसलिफ्टेड आवृत्ती लाँच करण्यासाठी सज्ज आहे. कोरियन कार निर्माती कंपनी ह्युंदाईने आपल्या अधिकृत वेबसाइटवर Grand i10 Nios बद्दल मुख्य तपशील उघड केले आहेत. तसंच या कारचं बुकिंगही सुरू केले आहे.
2 / 6
2023 Grand i10 Nios 11,000 रुपयांच्या टोकन रकमेवर ऑनलाइन बुक करता येईल. ऑटो एक्स्पो 2023 दरम्यान किमतीची घोषणा केली जाण्याची अपेक्षा आहे. ह्युंदाई मोटर्स यात सहभागी होणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी या आय 10 चे सीएनजी फेसलिफ्ट व्हेरियंटही लाँच करणार आहे.
3 / 6
नवीन Grand i10 Nios अनेक नवीन फीचर्ससह, नवे सेफ्टी पॅकेज आणि नवीन एक्सटिरिअर येईल. डिझाइनच्या दृष्टीने यात काही बदल करण्यात आले आहेत. त्याच्या बदलामध्ये, समोरील बाजूस एक न्यू लूकसह ब्लॅक रेडिएटर ग्रिल आणि LED DRL दिसेल. ही कार 15-इंचाच्या अलॉय व्हीलसह येईल. नवीन टेललाइट युनिटसह टेलगेट डिझाइन देखील बदलण्यात आले आहे.
4 / 6
2023 Grand i10 Nios नवीन कलर स्पार्क ग्रीनसह 6 कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल. या कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे मॅन्युअल किंवा एएमटी ट्रान्समिशन पर्यायांसह येऊ शकते. हे इंजिन 83PS ची कमाल पॉवर आणि 113.8Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
5 / 6
Hyundai फक्त मॅन्युअल गिअरबॉक्ससह हॅचबॅकचे CNG व्हेरिअंटदेखील लाँच करणार आहे. CNG व्हेरिअंट 69ps पॉवर आणि 95.2Nm टॉर्क आउटपुट निर्माण करण्यास सक्षम आहे.
6 / 6
Grand i10 Nios मध्ये इंटीरियर नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, USB-C चार्जिंग पोर्ट, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले, वायरलेस चार्जिंगसह इतर फीचर्ससह देखील अपडेट केले जाईल. क्रूझ कंट्रोल, ईएससी, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यासारखे नवीन फीचर्सही नवीन ग्रँड i10 निओसमध्ये पाहता येतील. Hyundai ही कार 4 आणि 6 एअरबॅग्ससह लाँच करू शकते.
टॅग्स :Hyundaiह्युंदाईAutomobileवाहन