Hyundai, Tata's tension will increase, Maruti will launch two new cars brezza baleno cng
Hyundai, Tata चं टेन्शन वाढणार, Maruti दोन जबरदस्त नव्या गाड्या लाँच करणार! By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 6:42 PM1 / 8मारुती सुझुकी लवकरच दुसऱ्या जनरेशनच्या ब्रेझा आणि बलेनो सीएनजीचे दोन नवे मॉडेल्स लाँच करणार आहे. या दोन्ही मॉडेल्सनंतर, कंपनी नवीन मिड-साइज एसयूव्ही देखील लॉन्च करणार आहे. ही कार टोयोटासोबत एकत्रितपणे तयार करण्यात येणार आहे. या कार 2022 च्या सणासुदीच्या हंगामात येण्याच्या बातम्या आहेत.2 / 82022 Brezza - मारुती जून महिन्यात नव्या जनरेशनची ब्रेझा लॉन्च करण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप याची अधिकृत लॉन्च डेट समोर आलेली नाही. डिलरशिप लेव्हलवर या गाडीसाठी प्री-बुकिंग आधीपासूनच सुरू झाली आहे. 3 / 8डिझाइन, फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत 2022 मारुती ब्रेझा सध्याच्या मॉडेलपेक्षा खूप वेगळी असेल. एसयूव्ही अपडेटेड 1.5L K15C पेट्रोल इंजिनसह येईल.4 / 8ब्रेझा सध्याच्य मॉडेलपेक्षा अधिक मायलेज देईल. यात नवीन 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असेल. नवी ब्रेझा सीएनजी किटच्या पर्यायासह देखील उपलब्ध केली जाऊ शकते. 5 / 8फीचर्सचा विचार करता, या कारमध्ये पूर्वीच्या तुलनेत अधिक फीचर्स असतील. ही SUV नवीन SmartPlay Pro+ इंटरफेस, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस फोन चार्जिंग, नवीन फ्लॅट बॉटम स्टीअरिंग, नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 6 एअरबॅग्ज, एक मोठी 9.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह बाजारात येईल.6 / 8Baleno CNG - मारुती सुझुकी नवे बलेनो हॅचबॅकचे सीएनजी व्हर्जन तयार करत आहे, ही कार येणाऱ्या काही महिन्यांत बाजारात येईल. या कारमध्ये फॅक्ट्री फिटेड सीएनजी किट सह 1.2 लिटर डुअलजेट पेट्रोल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. 7 / 8बलेनोचे पेट्रोल मॉडेल 22kmpl हून अधिक मायलेज देते. ही नवी मारुती बलेनो सीएनजी केवळ मॅन्युअल ट्रांसमिशनसह बाजारात उतरवली जाईल. या कारचे मायलेज जवळपास 25kmpl एवढे असेल. 8 / 8हॅचबॅकच्या सीएनजी व्हेरिअंटची किंमत तिच्या पेट्रोल मॉडेलच्या तुलनेत (अदाचे जवळपास 60,000 रुपये ते 70,000 हजार रुपये) अधिक असण्याचा अंदाज आहे. सध्या, बलेनोची किंमत 6.35 लाख रुपये ते 9.49 लाख रुपये एढी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications