Hyundai's ioniq 5 second electric car arrived; Range of 480 km on a single charge
Hyundai ची नवीन इलेक्ट्रीक कार आली; एका चार्जिंगमध्ये 480 km ची रेंज By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 3:19 PM1 / 10भारतातील ऑटो सेक्टरमध्ये मोठे नाव असलेल्या दक्षिण कोरियाच्या ह्युंदाईने आपली दुसरी इलेक्ट्रीक कार प्रदर्शित केली आहे. या कारचे नाव Ioniq 5 असून कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारात अन्य काही कारचे प्रदर्शन केले आहे. 2 / 10ह्युंदाईच्या या Ioniq 5 ही हायड्रोजन फ्युअल सेल असलेली एसयुव्ही आहे. या कारला जागतिक स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही कार टेस्लाच्या मॉडेल ३ ला कडवी टक्कर देताना दिसत आहे.3 / 10ह्युंदाईने या कारमध्ये 72.6 किलोवॉट क्षनतेचे बॅटरी पॅक दिले आहे. या बॅटरीवर कंपनीने असा दावा केला आहे की, एकदा फुल चार्ज झाली की 480 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. याचसोबत कारचा टॉप स्पीड हा 185 किमी प्रति तास आहे. 4 / 10कार केवळ 8.5 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रति तासाचा वेग पकडते. या कारमध्ये ५८ किलोवॉटची मोटर देण्यात आली आहे. जी 168 एचपीची ताकद आणि 350 एनएमचा टॉर्क जनरेट करते. 5 / 10कारचे दुसरे मॉडेल म्हणजेच ऑल व्हील ड्राईव्ह मॉडेलचे सांगायचे झाल्यास, ही कार 232 एचपीची ताकद आणि 605 एनएमचा टॉर्क जनरेट करते. या मोडवर कार 6.1 सेकंदांत 0 ते 100 किमीचा वेग घेते. 6 / 10कारच्या अन्य फीचरबाबत बोलायचे झाले तर, आयकोनिक ५ मध्ये काही मोठे बदल झाले आहेत. याच्या गिअर सिलेक्टरला स्टीअरिंग व्हीलच्या मागील बाजुला देण्यात आले आहे. 7 / 10कार जास्त आकर्षक बनविण्यासाठी यामध्ये पॉप अप डोअर हँडल्स, ब्लॅक रुफ, रेक्ड फ्रंट, नवीन डिझाईनचे एलईडी हेडलँपशिवाय 20 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. 8 / 10ह्युंदाईने ग्राहकांचा विचार करताना दोन्ही बाजुला चार्जिंग पोर्ट दिला आहे. यामुळे चार्जिंग स्टेशनवर कोणत्याही दिशेने कार चार्ज करता येणार आहे. पेट्रोल पंपावरची हालत यामध्ये होणार नाही. 9 / 10फीचर्समध्ये 12 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आली आहे. यासोबत अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो कनेक्ट सोय असणार आहे. 10 / 10भारतात ही कार लाँच होणार की नाही किंवा कधी होणार याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतू भारतात स्पर्धा वाढल्याने कोनाच्या बरोबरीने ही कार यंदाच लाँच केली जाण्याची शक्यता आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications