शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता कारमध्ये CNG किट लावता येणार नाही? वाहन चालकांसाठी मोठी अपडेट; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 9:47 AM

1 / 9
आताच्या घडीला देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सार्वकालिक उच्चांकावर आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड मोठी वाढ झाल्याने भारतातील इंधनदर १२ ते १५ रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2 / 9
सततच्या इंधनदराच्या वाढीमुळे हजारो ग्राहक आता CNG या पर्यायाकडे वळताना दिसत आहेत. ग्राहकांच्या मागणीमुळे अनेकविध कंपन्या आपल्या कार, वाहने CNG पर्यायांत उपलब्ध करत आहेत. मात्र, काही ग्राहक आफ्टरमार्केट CNG किट बसवून घेताना दिसत आहेत.
3 / 9
मात्र, CNG किट संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आल्याचे सांगितले जात आहे. वाहनांत सीएनजी आणि एलपीजीवरून एक मोठी माहिती समोर आली आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या रस्ते वाहतूक राजमार्ग मंत्रालयाने वाहनांसंबंधी अधिसूचनेची ही नवीन अपडेट दिली आहे.
4 / 9
इंडियन ऑटो एलपीजी कोअलिशनने (आयएसी) भारत स्टेज ६ (बीएस-६) उत्सर्जन मानकच्या वाहनांना को-ऑटो एलपीजी आणि सीएनजीमध्ये बदलण्यासंबंधी रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेवर प्रश्न उपस्थित केले आहे.
5 / 9
BS-VI वाहने LPG आणि CNG मध्ये रूपांतरित करण्यासाठी, क्रॅश टेस्ट आणि सेवेमध्ये अनुरूपता असणे आवश्यक आहे, अशा प्रकारची अधिसूचना रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने काढली आहे. या अधिसूचनेवर आयएसीने आक्षेप घेतला आहे.
6 / 9
इंडियन ऑटो एलपीजी कोअलिशननुसार, मंत्रालयाने काढलेली अधिसूचना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी नाही. यासंदर्भात आएसीने मंत्रालयाला पत्र लिहून आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत. मंत्रालयाने अधिसूचना लागू करायची म्हटली, तर वाहनांमध्ये CNG किट लावणे कठीण होईल. कारण, अधिसूचनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार आहे, असे सांगितले जात आहे.
7 / 9
आएसीने आपल्या पत्रात म्हटले आहे की, यांसारख्या प्रस्तावाला पुढे करण्यात आल्याने बाहेरील व्हेईकल पार्ट्स बनवणाऱ्या रेट्रोफिटमेंट फर्मोंच्या तुलनेत ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चररला (ओईएम) समान संधी देण्याच्या स्थितीवर परिणाम होईल.
8 / 9
हे पाऊल सरकारच्या लाँग टर्म इन्वायरमेंट गोलसोबत समझोता केल्यासारखे ठरू शकेल. आयएसीने म्हटले की, असा अंदाज आहे की, रेट्रोफिटमेंट फर्मोंला दर तीन वर्षात रिन्यूअल करण्यावर १० कोटी रुपयाचा खर्च येईल.
9 / 9
अनेक जण आपल्या वाहनात सीएनजी किट लावत असतात परंतु, आता वाहनांत CNG किट लावण्यावरून आलेल्या या अधिसूचनेनंतर त्यावर परिणाम होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योग