शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Car मध्ये 'या' लाईट्स दिसल्या तर व्हा सावध, त्वरित थांबवा कार; चुकवावी लागेल मोठी किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 3:31 PM

1 / 7
आपली कार वर्षानुवर्षे टिकून राहावी आणि रस्त्यात आपल्या वाहनाला काही होऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी वाहनांची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे.
2 / 7
जर तुम्हाला वाटत असेल की फक्त सर्व्हिस वेळेवर पूर्ण करणं पुरेसं आहे आणि कारला कोणतीही अडचण येणार नाही, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कोणताही त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला कारकडून मिळणाऱ्या सिग्नलची काळजी घ्यावी लागते.
3 / 7
ऑईल प्रेशर वॉर्निंग लाईट - हा लाईट कारच्या ऑइल प्रेशर सिस्टममध्ये दोष दर्शवतो. हा लाईट पेटणं म्हणजे इंजिन ऑइल कमी असल्याचं किंवा नीट काम करत नसल्याचं लक्षण आहे. हा लाईट दिसला की लगेच गाडी थांबवा. इंजिन ऑईलची पातळी आणि कोणतीही गळती तपासा. गरज असल्यास कार मेकॅनिककडे घेऊन जा.
4 / 7
इंजिन टेम्परेचर वॉर्निंग लाईट - हा लाईट म्हणजे इंजिन जास्त गरम होत असल्याचा संकेत आहे. हे कूलंट संपल्यामुळे किंवा कूलिंग सिस्टम खराब झाल्यामुळे असू शकते. अशा स्थितीत गाडी ताबडतोब थांबवा आणि त्यात कूलंट टाका. कूलंटची उपलब्धता नसल्यास, आपण फक्त पाणी देखील टाकू शकता. कूलंट टाकण्यापूर्वी कार बंद केली पाहिजे, तसंच इंजिनला थंड होऊ द्यावं. यानंतरही लाइट दिसत असेल तर मेकॅनिककडे घेऊन जा.
5 / 7
इंजिन वॉर्निंग लाईट - हा लाईट चेक इंजिन लाइट म्हणून ओळखला जातो. हा लाईट इंजिनशी संबंधित अनेक दोष दर्शविण्याचे काम करतो. जर हा लाईट काही वेळानं दिसेनासा झाला तर काळजी करण्यासारखं काही नाही. परंतु, जर तो सातत्यानं दिसत राहिला तर ही गंभीर समस्या दर्शवते. अशा परिस्थितीत लवकरात लवकर कार मेकॅनिककडे नेली पाहिजे.
6 / 7
बॅटरी अलर्ट लाईट - हा लाईट कारच्या चार्जिंग सिस्टममधील समस्या दर्शवतो. सैल बॅटरी केबल किंवा इतर इलेक्ट्रिकल फॉल्टमुळे ते जळू शकते. जर गाडी सुरू झाली नाही तर बॅटरी केबल हलवण्याचा प्रयत्न करा आणि जर समस्या सुटली नाही तर कार मेकॅनिककडे नेली पाहिजे.
7 / 7
बॅटरी अलर्ट लाईट - हा लाईट कारच्या चार्जिंग सिस्टममधील समस्या दर्शवतो. सैल बॅटरी केबल किंवा इतर इलेक्ट्रिकल फॉल्टमुळे ते जळू शकते. जर गाडी सुरू झाली नाही तर बॅटरी केबल हलवण्याचा प्रयत्न करा आणि जर समस्या सुटली नाही तर कार मेकॅनिककडे नेली पाहिजे.
टॅग्स :carकार