Imagine saying ...! young man builds home on wheels on bajaj tempo
भन्नाट कल्पना...! हौशी तरुणाने तीन चाकांवर उभे केले आलिशान घर By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 2:45 PM1 / 7मोठमोठे अभिनेते, अभिनेत्रींकडे आलिशान घरासारख्या सुविधा असणाऱी वाहने असतात. परदेशात तर मोटरहोम्स, कँपर व्हॅन, करावा अशा गाड्यांचा वापर होते. मात्र, भारतात कधी तीन चाकी वाहनाचे रुपांतर घरामध्ये केल्याचे कधी ऐकले आहे का? बेंगळुरुच्या एका तरुणाने हा जुगाड केला असून तीन चाकी टेम्पोला घरामध्ये रुपांतरीत केले आहे.2 / 7या 23 वर्षांच्या अरुण प्रभू या तरूणाने बजाजच्या टेम्पोलाच टेंटहाऊसमध्ये बदलले आहे. हा अरूण मुळचा तामिळनाडूच्या पारामथी वेल्लोर येथील रहिवासी आहे. त्याने होम ऑन व्हील्सच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवले आहे. 3 / 7बेंगळुरुची डिझाईन आणि आर्किटेक्ट कंपनी बिलबोर्डमध्ये हा तरुण काम करत आहे. त्याच्या या जुगाडामुळे सारेच हैरान झाले आहेत. त्याने पाच महिन्यांमध्य़े काही लाखांमध्ये हे घर बनविले आहे. अरुणला काही वेगळे करायचे होते. यामुळे त्याने होम ऑन व्हील्सवर काम करण्यास सुरूवात केली. 4 / 7आतापर्यंत ही कन्सेप्ट चार चाकी वाहनांवरच बनविण्यात आली होती. मात्र, तीन चाकी वाहनावर हा प्रकार नवीनच होता. त्याचबरोबर आव्हानेही होती. तीन चाकी वाहन असल्याने या घराचा बॅलन्स करणे खूप कठीण होते. तसेच वजनही जास्त नको होते. 5 / 7जुन्या बजाजच्या तीन चाकी पिकअपचा वापर करण्यात आला आहे. या तीन चाकीवर त्याने मिनी बसच्या फ्रेमचा वापर केला आहे. यामुळे त्याचा लोडिंग एरिया वाढला. हे घर घेऊन फिरताना, लांबच्या प्रवासावेळी आराम करता यावा यासाठी खास जागा हवी होती. 6 / 7महत्वाचे म्हणजे या घरामध्ये जी वीज मिळते त्यासाठी सोलार पॅनलचा वापर करण्यात आला आहे. या घरामध्ये एक बेडरूम, बाथरूम, किचन, वॉटर हीटर सारख्या सुविधा आहेत. तसेच 250 लीटरची पाण्याची टाकी आहे. बाहेरच्या बाजुला कपडे वाळविण्यासाठी हँगर, दरवाजे आणि शिडी देखिल आहे. 7 / 7या शिवाय या घराच्या छतावर खूर्चीत बसून आराम करण्यासाठी छत्रीही लावलेली आहे. या घराला स्थिरता देण्यासाठी खाली दुमडणारे खुरही देण्यात आले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications