शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सीएनजी कारचे मायलेज वाढवा अन् पैसे वाचवा! जाणून घ्या खास टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 4:48 PM

1 / 7
पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे देशात सीएनजी कारची मागणी वाढतेय. कारण सीएनजी अधिक किफायतशीर आहे. बघूया सीएनजी कारचा मायलेज वाढवण्याच्या टिप्स.
2 / 7
सीएनजी टँकमध्ये ओव्हरफिलिंग - सीएनजी टाकी पूर्णपणे भरणे टाळा. जास्त भरलेल्या टाकीमुळे आउटगॅसिंग होऊ शकते, ज्यामुळे मौल्यवान इंधनाचा अपव्यय होतो. पेट्रोल -डिझेल कारमध्ये ओव्हरफिल टाळण्याचा सल्ला दिला जातो, त्याचप्रमाणे सीएनजी टँकमध्येही गॅस पूर्ण भरू नये.
3 / 7
एसी आणि एअर हीटर वापरणे टाळा - पेट्रोल-डिझेल कारप्रमाणेच सीएनजी कारमध्येही एसी किंवा हीटरचा अतिवापर टाळा. दोन्ही खूप ऊर्जा वापरतात, परिणामी इंधनाचाही जास्त वापर होतो. नंतर एकूण इंधन बिलावर परिणाम होतो.
4 / 7
सीएनजी गॅस लिड नेहमी घट्ट बंद ठेवा - गॅस लीडमध्ये काही मार्ग किंवा गळती असल्यास इंधन टाकीमधून सीएनजी वायू बाष्पीभवन होऊ शकतो. गॅस लीड घट्ट बंद आहे याची खात्री करा. तसेच, सावलीत किंवा झाडाखाली पार्किंगला प्राधान्य द्या. त्यामुळे बाष्पीभवनची शक्यता कमी होईल.
5 / 7
टायर प्रेशर मेंटेन ठेवा - इंधनाचा प्रकार विचारात न घेता, इंधन कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी टायर प्रेशर मेंटेन ठेवणे फार महत्त्वाचे आहे. टायरमध्ये कमी हवा म्हणजे इंजिनवर जास्त प्रेशर, ज्यामुळे इंधनाचा वापर जास्त होतो. टायरचा दाब नेहमी निर्मात्याने शिफारस केलेल्या पातळीवर ठेवा.
6 / 7
इंजिन ट्यून-अप ठेवा - चांगल्या कामगिरीसाठी आणि इंधन कार्यक्षमतेसाठी इंजिन नेहमी ट्यून ठेवा. इंजिन खराब किंवा समस्या असल्यास इंधन कार्यक्षमता कमी होते.
7 / 7
एअर फिल्टर नियमित बदला - एअर फिल्टर तपासा नेहमी आणि नियमितपणे बदला. एअर फिल्टरमध्ये धूळ किंवा घाण अडकली असेल तर इंजिन जास्त प्रमाणात इंधन वापरते, ज्यामुळे कार्यक्षमता कमी होते.
टॅग्स :Automobileवाहनcarकार