शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tesla Electric Cars : भारतात तीन लोकांकडेच आहेत चार टेस्ला कार्स; एक अंबानी, दुसरा आहे मराठी अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 9:59 AM

1 / 9
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॅान मस्क (Elon Musk) यांच्या टेस्ला (Tesla) या कारची अनेकांना प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षा जानेवारी महिन्यात रजिस्ट्रेशन झाल्यानंतरही अद्याप भारतात टेस्लाच्या लाँचची स्थिती स्पष्ट होऊ शकलेली नाही.
2 / 9
परंतु टेस्लाचा असेही काही चाहते आहेत, जे ही कार लॅांच होईपर्यंत वाट पाहू शकलेले नाहीत. यांनी चक्क टेस्लाची कार खरेदी करून इम्पोर्टही केली. महत्त्वाचं म्हणजे टेस्लाच्या चाहत्यांमध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा (Reliance Industries) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नावाचाही समावेश आहे.
3 / 9
भारतात आतापर्यंत केवळ तीन जणांकडेच टेस्लाच्या चार कार्स आहेत. महागड्या गाड्यांची आवड असलेल्या मुकेश अंबानी यांच्याकडे एक नाही तर दोन टेस्ला कार्स आहेत.
4 / 9
२०१९ मध्ये त्यांनी आपली पहिली टेस्ला कार खरेदी केली. त्यांच्या पहिल्या टेस्ला कारचं मॅाडेल S-100D (Tesla Model S-100D) आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार ४९५ किमीची रेंज देते. तर याचा टॅाप स्पीड २४९ किमी प्रति तास इतका आहे. ही कार केवळ ४.३ सेकंदात ० ते १०० चा स्पीड पकडते.
5 / 9
यानंतर अंबानी यांनी Tesla Model X 100D हे मॉडेल खरेदी करून आपल्या स्तरावर इम्पोर्ट केलं. पांढऱ्या रंगाची ही कार आतापर्यंत रस्त्यावर फारच कमी दिसली आहे.
6 / 9
ही कारही मीड व्हेरिअंटची आहे आणि एकदा चार्ज केल्यानंतर ती ४७५ किमीची रेंज देते. ही कार केवळ अडीच सेकंदात १०० किमीचा स्पीड पकडू शकते.
7 / 9
यांच्याशिवाय टेस्ला कार मालकीची असलणाऱ्यांपैकी दोन्ही व्यक्ती बॉलिवूडमधील आहे. बॉलिवूडमधील मराठमोठा अभिनेता रितेश देशमुख याच्याकडेही Tesla Model X. ही कार त्याची पत्नी जेनिलिया हीला भेट म्हणून मिळाली होती.
8 / 9
तर माजी मिस इंडिया पॅसिफिक पूजा बत्रा हिच्याकडेही टेस्लाची कार आहे. तिच्याकडे एन्ट्री लेव्हल Tesla Model 3 आहे. बेस मॉडेल असलं तरी ही कार ५ सेकंदात १०० किमीचा स्पीड पकडते. तर या कारची रेंज ३८६ किमी आणि टॉप स्पीड २०० किमी प्रति तास इतका आहे.
9 / 9
यामध्ये एस्सार समुहाचे प्रशांत रुईया यांचं नाव प्राधान्यानं येतं. टेस्ला कारची मालकी असलेले ते पहिले भारतीय आहेत. त्यांच्याकडे २०१७ पासूनच टेस्ला कार आहे. त्यांच्याकडे निळ्या रंगाची Tesla Model x आहे. या इलेक्ट्रीक कारमध्ये दोन मोटर्स आहेत. तसंच यात सात सीट्स आहेत. ही कार ४.८ सेकंदात १०० किमीचा स्पीड पकडू शकते.
टॅग्स :Teslaटेस्लाMukesh Ambaniमुकेश अंबानीRitesh Deshmukhरितेश देशमुख