india cars with highest waiting period mahindra xuv700 to tata punch and maruti ertiga know details
देसी कंपन्यांचा जलवा! ‘या’ ५ कारचे वेटिंग दीड वर्षांवर पोहोचले; तुम्ही केलीय का बुक? पाहा, यादी By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 1:40 PM1 / 12गेल्या काही महिन्यांमध्ये मारुती, महिंद्रा आणि टाटा या देसी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत आपला जलवा कायम ठेवला आहे. विक्रीच्या बाबतीत मारुती आणि टाटा अनुक्रमे १ आणि दोन क्रमांकावर असून, महिंद्रा अनेक कंपन्यांना मागे टाकत पुढे जात आहे. 2 / 12सेमीकंडक्टर चीपच्या कमतरतेमुळे कारची डिलिव्हरी आणि उत्पादन यांना फटका बसला आहे. ग्राहकांनी बुक केलेल्या कारची डिलिव्हरी देणे कंपन्यांना शक्य होत नाहीए. त्यामुळे वेटिंग पीरियड वाढत चालला आहे. 3 / 12या ५ कार सर्वात मोठ्या वेटिंग पीरियड सोबत मिळत आहेत. यातील एका एसयूव्हीचा वेटिंग पीरियड १८ महिन्यांपर्यंत आहे. २०२१ च्या सर्वात मोठ्या लाँचिंग पैकी एक असलेल्या Mahindra XUV700 चा वेटिंग पीरियड आधीपेक्षा कमी झाला आहे. परंतु, अजूनही हा दीड वर्षांपर्यंत आहे. याच्या लाँचिंग नंतर या ७ सीटरचा वेटिंग पीरियड ७५ आठवडे होता. 4 / 12आता हा कमी होवून ७१ आठवडे (१८ महिने) झाला आहे. कंपनीकडे याचे ७५ हजार यूनिटची डिलिव्हरी ऑर्डर आधीपासून आहे. परंतु, वेगवेगळ्या व्हेरियंटचा वेटिंग पीरियड वेगवेगळा आहे. परंतु, सर्वात कमी वेटिंग पीरियड MX, AX3 आणि AX5 च्या पेट्रोल व्हेरियंटचा ६ महिने आहे. 5 / 12दुसरीकडे महिंद्रा थारचा वेटिंग पीरियड १२ महिन्यांपर्यंत आहे. लाँचिंगपासून या गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला. गाडीचा नवा लूक ग्राहकांच्या पसंतीस पडला आहे. थारमध्ये २.० लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे.6 / 12हे इंजिन १५० bhp पॉवर आणि ३२० पीक टॉर्क निर्माण करतं. यासोबतच थारमध्ये एक २.२ लीटर mHawk डिझेल इंजिनही आहे. हे इंजिन १३०bhp पॉवर आणि ३००Nm पीक टॉर्क निर्माण करतं. कंपनीने दोन्ही इंजिनसोबत ६-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी (AMT) गिअरबॉक्सचा पर्याय आहे.7 / 12मार्केटमध्ये येताच धुमाकूळ घालणाऱ्या टाटा मोटर्सची मायक्रो एसयूव्ही टाटा पंचची डिलिव्हरी आता ९ महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागेल. कंपनीची सर्वात जास्त विकली जाणाऱ्या गाड्यांपैकी एक टाटा नेक्सॉनचा वेटिंग पीरियड वाढून आता ४ महिने झाला आहे. 8 / 12टाटा पंचमध्ये ७ इंची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, आयआरए कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, २७ कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत. पंचला सुरक्षेच्या दृष्टीनेही सेफ्टीमध्ये ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. यात रिव्हर्स कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपर, एबीएस विथ ईबीडी, दोन एअरबॅग, ISOFIX एंकर, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, टायर पंक्चर रिपेअर किट देण्यात आले आहेत.9 / 12देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी ७ सीटर मारुती अर्टिगासाठी नवीन ग्राहकांना ९ महिन्यांपर्यंत वेटिंग पीरियड आहे. हे सीएनजी व्हेरियंटसाठी आहे. तर पेट्रोल व्हेरियंटसाठी ग्राहकांना ५ महिन्यासाठी आहे. मारुतीची सर्वात जास्त विकणारी कार वेगनआरसाठी ग्राहकांना १ महिन्यासाठी वेटिंग मिळत आहे. 10 / 12देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुतीची ही स्वस्त एमपीव्ही कार असून Ertiga च्या मागणीत प्रचंड वाढ झालीये. त्याचे एक मोठे कारण म्हणजे परवडणारी किंमत व जबरदस्त मायलेज. Maruti Suzuki Ertiga ही सध्या भारतात सर्वाधिक विकली जाणारी MPV कार आहे. ही MPV भारतीय बाजारपेठेत पेट्रोल आणि CNG या दोन्ही आवृत्त्यांमध्ये येते. 11 / 12ह्युंदाई मोटर्सची पॉप्यूलर गाड्यांपैकी एक असलेल्या Hyundai Creta ची डिलिव्हरी आणण्यासाठी तुम्हाला १० महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. याच्या ई ट्रिमसाठी सर्वात मोठा वेटिंग पीरियड आहे. SX आणि SX(O) व्हेरियंट्सची सर्वात जास्त डिमांड आहे. त्यामुळे याचा वेटिंग पीरियड सुद्धा खूप मोठा आहे. 12 / 12सध्या ह्युंदाई क्रेटा E, EX, S, SX Executive, SX आणि SX(O) ट्रिम मध्ये उपलब्ध आहे. क्रेटाला तीन इंजिन ऑप्शन मध्ये बाजारात उतरवले आहे. जे किआ सेल्टॉस मधून घेण्यात आले आहे. यात १.४ लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि १.५ लीटरचे पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा समावेश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications