शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' देशांमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सच्या मदतीनं चालवू शकता गाडी; पाहा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 5:15 PM

1 / 17
आपण आपल्या देशातील रस्त्यांवर गाडी तर चालवतो. पण आपण कधी परदेशात गेलो तर त्या ठिकाणी गाडी चालवण्याचा मोह आपल्याला आवरला जात नाही.
2 / 17
परंतु असे काही देश आहेत ज्या ठिकाणी आपण भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सच्या जोरावरच परदेशातही प्रवास करू शकू. आपण पाहुया कोणते आहेत ते देश आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल.
3 / 17
ऑस्ट्रेलिया - या देशात भारतीय लायसन्सवर गाडी चालवण्यास परवानगी आहे. परंतु त्यासाठी काही अटींचं पालन करावं लागेस. त्यानुसार मुख्य अट म्हणजे तुमचा लायसन्स हा इंग्रजीत असायला हवा. असं असल्यास त्या ठिकाणी तुम्हाला तीन महिने गाडी चालवण्याची परवानगी मिळेल.
4 / 17
जर्मनी - जर्मनीमध्ये भारतीय लायसन्सवर जवळपास सहा महिने ड्रायव्हिंग करणं शक्य आहे. या ठिकाणीही तुमचं लायसन्स स्थानिक भाषेत नाही तर इंग्रजीतच असणं अनिवार्य आहे.
5 / 17
न्यूझीलंड - न्यूझीलंडमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर गाडी चालवण्यासाठी एका वर्षाची परवानगी देण्यात येते.
6 / 17
स्वित्झर्लंड - स्वित्झर्लंडसारख्या ठिकाणी कार चालवणं कोणाला आवडणार नाही. परंतु या देशाच्या नियमाप्रमाणे भारतीय लायसन्सवर आपल्याला १ वर्षापर्यंत गाडी चालवण्याची परवानगी मिळते. या ठिकाणी तुम्ही लायसन्सच्या आधारे गाडी भाड्यानंही घेऊन चालवू शकता.
7 / 17
स्वित्झर्लंड - स्वित्झर्लंडसारख्या ठिकाणी कार चालवणं कोणाला आवडणार नाही. परंतु या देशाच्या नियमाप्रमाणे भारतीय लायसन्सवर आपल्याला १ वर्षापर्यंत गाडी चालवण्याची परवानगी मिळते. या ठिकाणी तुम्ही लायसन्सच्या आधारे गाडी भाड्यानंही घेऊन चालवू शकता.
8 / 17
युनायटेड किंगडम : जर तुमचा लायसन्स इंग्रजी भाषेत असेल तर युनायटेड किंगडममध्ये तुम्ही एका वर्षापर्यंत गाडी चालवू शकता.
9 / 17
दक्षिण आफ्रिका - दक्षिण आफ्रिकेत सहजरित्या भारतीय लायसन्सवर ड्रायव्हिंग करता येऊ शकते. परंतु या ठिकाणी तुमच्या लायसन्सवर तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि त्यावरील मजकूर हा इंग्रजी भाषेतच असणं आवश्यक आहे.
10 / 17
फ्रान्स - फ्रान्समध्ये येणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर एका वर्षापर्यंत कार चालवण्याची परवानगी देण्यात येते. परंतु यासाठी एक अट अशी की तुमचा लायन्स फ्रान्सच्या भाषेतही अनुवादीत होणं अनिवार्य आहे.
11 / 17
कॅनडा - कॅनडामध्येही भारतीय लायसन्सवर सहजरित्या कार चालवणं शक्य आहे.
12 / 17
सिंगापूर - सिंगापूर सरकार परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी त्यांच्या लायसन्सवर एका वर्षापर्यंत देशात गाडी चालवण्याची परवानगी देते. याव्यतिरिक्त तुम्ही हाँगकाँग आणि मलेशियामध्येही कार ड्राईव्ह करू शकता.
13 / 17
भूटान - भूटानमध्येही भारतीयांना ड्रायव्हिंगचा अनुभव घेता येतो. या ठिकाणी टू व्हिलक किंवा फोर व्हिलर अशी कोणतीही गाडी चालवू शकता.
14 / 17
फिनलँड - फिनलँडच्या नियमानुसार तुम्ही देशभरात एका वर्षापर्यंत गाडी चालवू शकता. परंतु यासाठी तुमच्यासोबत हेल्थ इन्शुरन्स असणं अनिवार्य आहे.
15 / 17
मॉरिशर - मॉरिशसचे नियम इतर देशांच्या मानानं अधिक कठोर आहेत. या देशात भारतीय लायसन्सवर केवळ एका दिवसापुरतीचं गाडी चालवण्याची परवानगी देण्यात येते.
16 / 17
इटली - इटलीमध्येही भारतीय लायसन्सवर गाडी चालवणं शक्य आहे. परंतु यासाठी तुमचा लायसन्स आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिटसोबत असणं आवश्यक आहे.
17 / 17
नॉर्वे - या देशात तुम्ही भारतीय लायसन्सवर ३ महिन्यांपर्यंत भारतीय लायसन्वर गाडी चालवता येणार आहे.
टॅग्स :carकारUnited StatesअमेरिकाEnglandइंग्लंडItalyइटलीFranceफ्रान्सBhutanभूतानsingaporeसिंगापूर