शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नेपाळला पोहचली भारतात सर्वाधिक विक्री होणारी TATA कार; किंमत ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 2:59 PM

1 / 8
देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने त्यांची बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक एसयूवी Nexon EV Max आता नेपाळच्या बाजारात लॉन्च केली आहे. आकर्षक लूक आणि दमदार बॅटरी पॅकसह ही कार भारतीय ग्राहकांच्या पसंतीस पडली आहे.
2 / 8
भारतात NEXON EV MAX इलेक्ट्रिक एसयूवीची सुरुवातीची किंमत १६.४९ लाख रुपये आहे. तर या कारची लोअर रेंज व्हर्जन Nexon EV Prime बाजारात उपलब्ध आहे. ज्याची किंमत १४.४९ लाख रुपये इतकी आहे.
3 / 8
टाटा कंपनीने नेपाळच्या बाजारात Nexon EV Max ७.२ किलो व्हॅट चार्जिंग पर्यायाने लॉन्च केली आहे. जिप्ट्रान तंत्रज्ञानासह ही इलेक्ट्रिक कार एकूण ३ रंगात आहे. ज्यात इंटेंसी टील, डेटोना ग्रे आणि प्राइस्टीन व्हाइट कलरचा समावेश आहे.
4 / 8
नेपाळमध्ये टाटा कंपनीच्या Nexon EV ची किंमत जवळपास ४६.४९ लाख रुपये आहे. जी भारतीय चलनानुसार, २९ लाख रुपयाच्या आसपास आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये ४०.५ kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरला आहे, जी एका चार्जमध्ये चार्ज होऊ शकते.
5 / 8
ही कार ४५३ किमी पर्यंतच्या ड्रायव्हिंग रेंजसह येते. कारची इलेक्ट्रिक मोटर १३४ hp ची पॉवर आणि २५० Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की ही, SUV फक्त ९ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते.
6 / 8
७.२ kW फास्ट चार्जर SUV ची बॅटरी केवळ ५६ मिनिटांत ८० टक्के चार्ज करते आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे ६.५ तास लागतात. यात सिटी, इको आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड आहेत.
7 / 8
Nexon EV Max Dark मध्ये सनरूफसह, अर्ध-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, AQI डिस्प्लेसह एअर प्युरिफायर, क्रूझ कंट्रोल, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, मागील एअर कंडिशनिंग व्हेंट्स, 7-इंचाचा मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले (MID) आहे.
8 / 8
दुसरीकडे, सुरक्षेच्या दृष्टीने यात दोन एअरबॅग, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आहे. जरी या इलेक्ट्रिक आवृत्तीची क्रॅश चाचणी केली गेली नाही, परंतु ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये त्याच्या ICE इंजिन मॉडेलला 5-स्टार रेटिंग देण्यात आले आहे.
टॅग्स :Tataटाटा