शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ola च्या Electric Scooter ची किंमत वाढणार; नव्या अपडेटचीही कंपनीकडून घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2022 1:00 PM

1 / 8
सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे लोक अन्य पर्यायांच्या शोधात आहेत. अशातच सध्या इलेक्ट्रीक वाहनांना (Electric Vehicles) मोठी पसंती मिळताना दिसतेय. ओलानं लाँच केलेल्या इलेक्ट्रीक स्कूटर्सना (Ola Electric Scooters) ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळली होती.
2 / 8
आता ओला 'एस 1 प्रो' (Ola S1 Pro) च्या किंमतीत आता वाढ होणार आहे. आता पुन्हा याचं बुकिंग सुरू होईल तेव्हा कंपनी या स्कूटरची विक्री वाढलेल्या किंमतीनुसार केली जाईल. सध्या ओला एस वन प्रो ची किंमत 129999 लाख रुपये आहे. 18 मार्चनंतर किंमतीत ही वाढ केली जाणार आहे.
3 / 8
ओला इलेक्ट्रीकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी आज ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसंच ओला अॅपद्वारेही आता स्कूटर खरेदी करता येणार आहे. याशिवाय अग्रवाल यांनी खरेदीला दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल ग्राहकांचे आभारही मानले.
4 / 8
ओलानं सणाच्या पार्श्वभूमीवर ओला एस वन प्रो केशरी रंगातही लाँच केला. हा केवळ दोनच दिवस म्हणजे 17 आणि 18 मार्च रोजी खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. तसंच या नव्या ऑर्डर एप्रिल महिन्यापासून डिस्पॅच केल्या जाणार असून त्या थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवल्या जाणार असल्याचं कंपनीनं म्हटलं.
5 / 8
याशिवाय कंपनीनं यात एका नव्या अपडेटचीही घोषणा केली आहे. हे अपडेट स्कूटरचा परफॉर्मन्स सुधारणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच मुव्हओएस 2.0 अपडेटसोबत नवे फीचर्सही येणार आहेत.
6 / 8
ओला एस 1 प्रो व्हेरिएंटमध्ये 3.97 kWh चा बॅटरी पॅक मिळत आहे. याशिवाय एस 1 प्रो व्हेरिएंटमध्ये 115 किमी प्रतितासाचा टॉप स्पीड मिळतो. याशिवाय सिंगल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 181 किलोमीटरची रेंज देते. तर याची खास बाब म्हणजे एस 1 प्रो व्हेरिएंट 3 सेकंदात 0-40 किलोमीटर प्रति तास वेग पकडते.
7 / 8
आणखी फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर स्कूटर पूर्ण एलईडी लाइटिंग पॅकेज आणि 7.0-इंच टच डिस्प्लेसह येते, यामध्ये नेव्हिगेशनचे देखील फीचर मिळते. यात 3-जीबी रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसर दिले आहे आणि वाय-फाय, ब्लूटूथ आणि 4 जी कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे.
8 / 8
ओलाने ही स्कूटर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डायरेक्ट टू होम सेल्स मॉडेलची निवड केली आहे आणि कोणतेही फिजिकल स्टोअर उघडले नाही. इच्छुक ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर लॉग इन करून किंवा अॅपद्वारे स्कूटर बूक करता येते.
टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर