शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वाहतूक नियम मोडल्याचे चलन न भरल्यास विम्याची रक्कम वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 9:26 AM

1 / 8
वाहतुकीचे नियम मोडल्यास नव्या नियमांनुसार दहापट दंड आकारला जाणार आहे. याची अंमलबजावणी काही राज्यांमध्ये करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र अद्याप दूर आहे.
2 / 8
नियम मोडल्यानंतर वाहन चालकाला ऑनलाईन पावती पाठविली जाणार आहे. मात्र, अनेकजण हा दंड भरण्यास टाळाटाळ करतात. अशा महाभागांवर कारवाईची क्लुप्ती शोधण्यात आली आहे.
3 / 8
वाहतूक पोलिसांकडून ऑनलाईन दंड आकारला जात आहे. हा दंड तब्बल लाखाच्या आसपासही जात आहे. यामुळे दंड न भरला तर तो आरटीओकडे वाहनावर जमा होत आहे.
4 / 8
ऑनलाईन पाहिल्यास हा दंड दिसतो. मात्र, तो वसुलण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. आता हा दंड वसुलण्यासाठी इन्शुरन्सचा आधार घेण्यात येत आहे.
5 / 8
दंड न भरणारा वाहनचालक वाहनाचा इन्शुरन्स काढायला गेल्यास विम्याच्या रक्कमेत वाढ होणार आहे.
6 / 8
भारतीय विमा नियामक प्राधिकरण (इरडा) ने या प्रयोग दिल्लीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो देशभरात लागू करण्यात येणार आहे.
7 / 8
दंडाची न भरलेली रक्कम आणि विम्याची रक्कम मोजल्यानंतरच विमा काढता येणार आहे. यामुळे दंडाची रक्कम न भरल्यास विमा काढता येणार नाही.
8 / 8
नवीन नियम लागू झाल्यानंतर इन्शुरन्स आणि पीयुसीसाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पहिल्या तीन दिवसांत तब्बल 84 हजार पीयुसी प्रमाणपत्रे देण्यात आली.
टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस