शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

International Men's Day : वाहनचालकांना या सवयी चांगला माणूस बनवतात...! पाहा कोणत्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 3:58 PM

1 / 6
दुचाकी किंवा चारचाकी चालविताना स्व:ताला घालून घेतलेल्या काही सवयी आपल्याबरोबरच दुसऱ्यांनाही फायद्याच्या ठरतात. भारतात दुचाकींची संख्या जगात सर्वाधिक आहे. 2017-18 या एकट्या वर्षात 20 दशलक्ष एवढ्या दुचाकी विकल्या गेल्या. जागतिक पुरुष दिनानिमित्त वाहन चालविण्यासाठीच्या चांगल्या सवयींचा घेतलेला आढावा.
2 / 6
वाहन चालविताना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. काही तरुण जोशामध्ये मोटारसायकली चालवितात. मात्र, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. सिग्नल लाल असताना वाहतुकीमध्ये घुसणे, पिवळी लाईट पेटलेली असताना त्या तीन सेकंदात चौक पार करण्यासाठी वेगाने वाहन हाकणे, उजवी-डावीकडे उगाचच ट्रॅफिकमधून वाहन वेडेवाकडे चालविणे अशा गोष्टी गंमत म्हणून करणे तुमच्यासह इतर वाहनचालकांसाठीही धोक्याचे असते. ही सवय सोडल्यास एक चांगले व्यक्ती बनू शकता.
3 / 6
शहरात आणि गावांमध्येही रस्त्यांच्या प्रकारानुसार वेगावर बंधने असतात. शाळा, मंदिर आदी ठिकाणी वेगमर्यादेत वाहन चालविल्यास कोणाला त्रास होत नाही. गर्दीच्या रस्त्यांवरही उगाचच हॉर्न वाजवून ध्वनी प्रदुषण करू नये. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यास प्राधान्य द्यावे.
4 / 6
दुचाकी चालविताना वाहतुकीच्या नियमांबरोबरच सुरक्षेच्या बाबी पाळणेही गरजेचे आहे. हेल्मेट, हातमोजे आणि शक्य झाल्यास पायाला सुरक्षा देणारे पॅड आणि बूट वापरल्यास उत्तम. हेल्मेटची साईज योग्य आणि क्वालिटी चांगली असावी.
5 / 6
मोटारसायकलचे आरसे, इंडिकेटर, लाईट, ब्रेक आदी सुस्थितीत आहेत का याचीही पाहणी वेऴेवर करावी. वळताना दुसऱ्या वाहनाला सिग्नल देणे गरजेचे असते. यामुळे दुपारच्यावेळी उन्हामुळे इंडिकेटर मागील किंवा पुढून येणाऱ्या वाहनांना दिसत नाहीत. यावेळी शक्य झाल्यास सिग्नल देण्यासाठी हाताचा योग्य वापर करावा.
6 / 6
प्रवासावेळी एखादा वाहनचालक अडचणीत असल्यास त्याला मदत करावी. टायर पंक्चर, बल्ब किंवा फ्यूज गेली असेल, पेट्रोल संपले असेल तर शक्य होईल तेवढी मदत करावी. तसेच रात्रीच्यावेळी शक्यतो लो-बीमवर वाहन चालवावे.
टॅग्स :motercycleमोटारसायकलroad safetyरस्ते सुरक्षा