शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आजपासून भारतात सुरू झालं 'या' पॉवरफुल Electric Car चं बुकिंग; सिंगल चार्जमध्ये जाणार 470Kms

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 2:41 PM

1 / 8
जग्वार इंडियाने आपल्या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही I-Pace Black साठी अधिकृत बुकिंगची घोषणा केली. जागतिक बाजारपेठेत, या एसयूव्हीला त्याच्या जबरदस्त लूक आणि डिझाइनमुळे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
2 / 8
कंपनीने नवीन I-Pace Black एडिशनला नावाप्रमाणेच ब्लॅक फिनिश दिले आहे, ज्याचा वापर फ्रंट ग्रिल, स्राउंड ग्रिल, साइड विंडो आणि एसयूव्हीच्या मागील बाजूस देखील करण्यात आला आहे. आकर्षक 19-इंच डायमंड कट अॅलॉय व्हील्स या एसयूव्हीची साइड प्रोफाइल या कारला अधिक चांगला लूक गेतात. यालादेखील ग्लॉस डार्क ग्रे शेडनं सजवण्यात आलं आहे.
3 / 8
यामध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही स्पेशल एडिशन इलेक्ट्रीक कार गेल्या एप्रिलमध्ये जागतिक बाजारात सादर करण्यात आली.
4 / 8
कंपनीने या इलेक्ट्रीक SUV मध्ये 90 kWh क्षमतेचे बॅटरी पॅक दिले आहे. त्यात देण्यात आलेल्या दोन इलेक्ट्रीक मोटर्स 396 bhp आणि 696 Nm टॉर्क जनरेट करतात.
5 / 8
कंपनीचा दावा आहे की ही कार 0 ते 100 किमी प्रतितासाचा स्पीड केवळ 4.8 सेकंदात पकडण्यास सक्षम आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही SUV 470 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.
6 / 8
जग्वार आय-पेस ब्लॅक एडिशन 100 किलोवॅटच्या रॅपिड चार्जरच्या मदतीने फक्त 45 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होते, ज्यात फास्ट चार्जिंग सिस्टम आहे.
7 / 8
त्याच वेळी, 7 किलोवॅट एसी वॉल बॉक्स चार्जरसह पूर्णपणे चार्ज करण्यासाठी या कारला 10 तास लागतात. जग्वार लँड रोव्हरने देशभरातील 19 शहरांमधील 22 रिटेल शोरूममध्ये चार्जर इन्स्टॉल केले आहेत.
8 / 8
मात्र, कंपनीने अद्याप या ब्लॅक एडिशनची किंमत जाहीर केलेली नाही. पण जग्वार I-Pace इलेक्ट्रिक SUV ची किंमत 1.06 कोटी ते 1.12 कोटी दरम्यान आहे. असे मानले जाते की त्याची किंमत देखील याच्या आसपास असेल. लवकरच या SUV ची किंमत उघड करण्यात येईल.
टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनIndiaभारत