शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jaguar Land Rover: रेंज रोव्हर एसव्ही एसयूव्हीची बुकिंग सुरू, दमदार इंजिनसह मिळतात हे फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 4:17 PM

1 / 9
जॅगुआर लँड रोव्हर इंडिया (Jaguar Land Rover India) ने गुरुवारी भारतात नवीन रेंज रोव्हर SV SUV साठी बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली आहे.
2 / 9
जागतिक बाजारपेठेत आधीच सादर केलेली एसयूव्ही आता भारतीय ग्राहकांसाठीही उपलब्ध होणार आहे. 2022 रेंज रोव्हर SV अनेक पर्यायांसह उपलब्ध असून, यात ग्राहकांच्या इच्छेनुसार विशेष डिझाइन थीम मिळेल.
3 / 9
लँड रोव्हरच्या स्पेशल व्हेईकल ऑपरेशन्सद्वारे विकसित केलेली, एसयूव्ही स्टँडर्ड आणि लांब व्हीलबेस अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये पहिल्यांदाच लाँग व्हीलबेससाठी 5-सीटर कॉन्फिगरेशन देखील देण्यात आले आहे.
4 / 9
लूक आणि डिझाइन - रेंज रोव्हर एसव्हीच्या डिझाइनला नवीन फ्रंट बंपर आणि पाच बार ग्रिलसोबत अपग्रेड केले आहे. या गाडीला तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तुमध्ये स्मूद सिरेमिक, सस्टेनेबल लाकूड आणि चमकदार प्लेटेड मेटल सामील आहे.
5 / 9
पॉवरट्रेन आणि डिझाइन थीमच्या आधारावर ग्राहकांना आपल्या गाडीचे टायर निवडण्याची मुभा असेल. रेंज रोव्हर एसव्हीमध्ये विविध 12 प्रकारची चाके उपलब्ध आहेत. या सगळ्यांची साइज 23 इंच आहे.
6 / 9
इंजिन आणि शक्ती- रेंज रोव्हर एसव्हीमध्ये नवीन 4.4-लिटर ट्विन टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 523 hp ची कमाल पॉवर आणि 750 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.
7 / 9
यात 3.0-लिटर स्ट्रेट-6 डिझेल इंजिनचा पर्याय देखील आहे जो 346 hp पॉवर आणि 700 Nm पीक टॉर्क निर्माण करतो. मिळालेल्या माहितीनुसार, या गाडीची किंमत 4-4.40 कोटींच्या दरम्यान असेल.
8 / 9
लँड रोव्हर रेंज रोवर एसव्ही लाँग व्हीलबेस ग्राहकांना आपली एसयूव्ही चार सीट असलेल्या एसव्ही सिग्नेचर सूटसह कस्माइझ करण्याचा पर्याय देते.
9 / 9
रेंज रोव्हर एसव्ही मॉडेलमध्ये मागे बसणाऱ्या व्यक्तींसाठी 13.1-इंच इंटनटेनमेंट स्क्रीन असेल, जो रेंज रोव्हरची आतापर्यंतची सर्वात मोठी स्क्रीन आहे.
टॅग्स :Jaguarजॅग्वारLand Roverलँड रोव्हरAutomobileवाहन