Jaguar launches new sedan car XE; Price starts from Rs 44.98 lakhs
Jaguar XE : जग्वारची नवीन सेदान कार लाँच; किंमत ४४.९८ लाख रुपयांपासून By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 8:23 PM1 / 8जग्वार लँड रोव्हर इंडियाने आज नवीन जग्वार एक्सई लाँच केली. एस आणि एसई श्रेणीमध्ये उपलब्ध असलेली नवीन जग्वार एक्सई १८४ केडब्ल्यू इंगेनियम टर्बोचार्ज्ड पेट्रोल पॉवरट्रेन आणि १३२ केडब्ल्यू इंगेलियम टर्बोचार्ज्ड डिझेल पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.2 / 8नवीन जग्वार एक्सई पूर्वीपेक्षा अधिक मोठी आणि जमिनीपासून उंची कमी आहे. ऑल-एलईडी हेडलाइट्ससह आकर्षक 'जे' ब्लेड डेटाइम रनिंग लाइट सिग्नेचर आणि अॅनिमेटेड डायरेक्शनल इंटीकेटर्स देण्य़ात आले आहेत. 3 / 8एफ-टाइपप्रमाणे जग्वार स्पोर्टशिफ्ट सिलेक्टर ८-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. स्टिअरिंग व्हीलमध्ये 'हिडन-अन्टील-लिट' आणि अन्य स्वीच आहेत. 4 / 8स्मार्टफोन पॅक (अँड्रॉईड ऑटो™ व अॅप्पल कारप्ले™) देण्यात आले आहे. तसेच ड्रायव्हर सीटसाठी स्मार्ट सेटिंग्जसह एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), मिरर, ऑडिओ व क्लायमेट सेटिंग्ज, लेन किप असिस्ट व ड्रायव्हर कंडिशन मॉनिटर, ऑनलाइन पॅक (वाय-फायसह प्रो सर्विसेस, जे रिअल टाइम ट्राफिक माहिती, डोअर-टू-डोअर मार्ग आदी सेवा देण्यात आल्या आहेत. 5 / 8जग्वार एक्सईमध्ये नवीन २५.४ सेमी (१० इंची) 'टच प्रो' इन्फोटेन्मेंट स्क्रिन देण्यात आले आहे. 6 / 8फोनच्या माध्यमातून इंधनाची पातळी, विंडो ओपन अशा वाहनाच्या स्थितीबाबत तपासणी करण्याची सुविधा देणारे 'इनकंट्रोल रिमोट अॅपसह रिमोट', कनेक्टेड नेव्हिगेशन प्रो नेव्हिगेशन सिस्टिम, वायरलेस डिवाईस चार्जिंग, ३डी मॅप्स दाखवण्यासाठी हाय डेफिनिशन ड्रायव्हर डिस्प्ले देण्यात आले आहेत. 7 / 8या एसयुव्हीची किंमत ४४.९८ लाख रुपयांपासून सुरू होते. 8 / 8एक्सएफ ४९.७८ लाख रुपये, एफ-पेस ६३.७८ लाख रुपये, एक्सजे १११.३० लाख रुपये, एफ-टाईप ९०.९३ लाख रुपये एक्स शोरूम ठेवण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications