James Bond's dangerous Aston Martin will be auctioned; Machine car
जेम्स बाँडच्या खतरनाक अॅस्टन मार्टीनचा लिलाव होणार; मशीनगनने युक्त कार By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 1:18 PM1 / 7जेम्स बाँडच्या खतरनाक सिनेमांचे दिवाने असाल तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. जेम्स बाँडची 1965 मध्ये बनविलेली Aston Martin DB5 चा लिलाव केला जाणार आहे. यातून 42 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. 2 / 7जेम्स बाँडच्या कार त्याच्या सिनेमांमध्ये वापरल्या जात होत्या. या कारमध्ये मशीनगन, बुलेटप्रूफ काचा आणि बरेच काही तेव्हाचे हायटेक फिचर्स दाखविण्यात येत असत. ही कार त्याकाळातील तीन जिवंत जेम्स बाँडच्या कारपैकी एक आहे. 3 / 7या कारमध्ये 0.30 कॅलिबर मशीनगन, व्हील हब माऊंटेड टायर, पॅसेंजर सीट इंजेक्शन सिस्टिम, रिवॉल्विंग लायसेंस प्लेट आणि अन्य फिचर्स आहेत. ज्या तेव्हाच्या सिनेमामध्ये दाखविल्या जायच्या. 4 / 7या कारची पहिली विक्री 1969 मध्ये करण्यात आली होती. एका कलेक्टरने ही कार खरेदी केली होती. यानंतर स्मोकी माऊंटेन कार म्युझियमने ही कार खरेदी केली होती. 5 / 735 वर्षे प्रदर्शित केल्यानंतर ही कार 2006 मध्ये पुन्हा विकण्यात आली. यानंतर 2012 मध्ये ही कार दुरुस्त करण्यात आली होती. 6 / 7खरेतर ही कार प्रत्यक्ष सिनेमांमध्ये कधीच दाखविली नाही. या कारचा लिलाव ऑगस्टमध्ये करण्यात येणार आहे. 7 / 7खरेतर ही कार प्रत्यक्ष सिनेमांमध्ये कधीच दाखविली नाही. या कारचा लिलाव ऑगस्टमध्ये करण्यात येणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications