शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Flying Bike: फ्लाइंग बाईकचे बुकिंग सुरू, 40 मिनिटांपर्यंत हवेत उडत रहा, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 5:34 PM

1 / 8
रस्त्यांवर धावणारी बाईक हवेतून उडताना पाहणे किती रोमांचक असेल? खरे तर बाइक या रस्त्यावर चालविण्यासाठी डिझाइन केल्या जातात. पण तंत्रज्ञानाच्या या युगात, आता बाईक हवेतही उडू लागली आहे.
2 / 8
जगातील पहिली फ्लाइंग बाईक (Flying Bike) हवेत उडताना दिसली आहे. जगातील ही पहिलीच उडणारी बाइक अमेरिकेत दाखल झाली आहे. XTurismo असे या बाइकचे नाव असून ही एक होवरबाइक आहे. डेट्रॉइट ऑटो शोच्या 2022 मध्ये ही बाइक हवेत उडताना दिसून आली आहे. यानंतर या बाईकचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
3 / 8
किती आहे स्पीड...? XTURISMO ही अनोखी बाईक 40 मिनिटांपर्यंत हवेत उडू शकते. या बाइकच्या वेगाबद्दल बोलायचे झाल्यास ती 62 मैल प्रति तास एवढ्या वेगाने चालू शकते. ही बाईक ऑक्टोबर 2021 मध्ये सादर करण्यात आली होती. पहिल्यांदाच अमेरिकेत दिसून आलेल्या या बाईकला 'डार्क साइडसाठी लँड स्पीडर', असे नाव देण्यात आले आहे.
4 / 8
हवेत उडणारी जगातील ही पहिली बाइक जपानच्या AERWINS Technologies या कंपनीने तयार केली आहे. ही कंपनी एअर मोबिलिटी टेक्नॉलॉजी क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीने जपानमध्येच XTURISMO तयार केली आहे.
5 / 8
किती आहे किंमत? - ही बाईक 2023 पर्यंत अमेरिकेच्या बाजारात लॉन्च केली जाईल, अशी अशी आशा एअरविन्स टेक्नॉलॉजीज संस्थापक, संचालक शुहेई कोमात्सू यांनी व्यक्त केली आहे. XTurismo च्या किंमतीसंदर्भात बोलायचे झाल्यास, ही बाइक सध्या 770,000 अमेरिकी डॉलर मध्ये विकली जात आहे.
6 / 8
असं आहे डिझाईन - बाइकचे फ्यूचरिस्टिक डिझाइन गेल्या दोन वर्षांपासून डेव्हलप केले जात आहे. रायडरच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यात विविध प्रकारचे सेन्सर लावण्यात आले आहे. सध्या ही एक सिंगल रायडर बाइक आहे.
7 / 8
XTURISMO च्या डिझाइनसंदर्भात बोलायचे झाल्यास, हीची बॉडी बाइक सारखी दिसते. याच बरोबर ही हेलिकॉप्टर प्रमाणे जमिनीवरून हवेत उडते. हिला सेफ लँडिंगसाठी स्किड लावण्यात आले आहे.
8 / 8
विकत घेण्यासाठी काय करावं लागेल - हवेत उडणारी ही जगातील पहिली बाइक AERWINS Technologies च्या आधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑर्डर केली जाऊ शकते. ही बाइक सध्या लिमिटेड अॅडिशनमध्येच उपलब्ध आहे. ही आपल्याला रेड, ब्लू आणि ब्लॅक कलरमध्ये मिळेल. ही बाइक खरेदी करण्यासाठी आपल्याला 6 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा खर्च करावा लागेल.