शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jawa Bikes: शांतीत क्रांती! Jawaने गुपचूप लॉन्च केली 'ही' स्टायलिश बाइक, लूक पाहून प्रेमात पडाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 4:33 PM

1 / 5
Jawa 42 Bobber price and Features: 350 सीसी बाइक सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्ड टॉपची कंपनी है. या सेगमेंटमध्ये सर्वाधिक गाड्या याच कंपनीच्या विकल्या जातात. अशात रॉयल एनफील्डला टक्कर देण्यासाठी आणि बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी, इतर कंपन्याही आपल्या विविध गाड्या आणत असतात.
2 / 5
यातच आता महिंद्राची मालकी असलेल्या क्लासिक लीजेंड्स (Classic Legends) ने एक नलीन जावा बाईक लॉन्च की है. कंपनीने जावा 42 बॉबर (Jawa 42 Bobber) नावाची एक नवीकोरी बाइक लॉन्च केली आहे. या गाडीला जावाच्या इतर गाड्यांपेक्षा हटके लूक देण्यात आला आहे.
3 / 5
कंपनीने जावा 42 बॉबरला तीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केले आहे. प्रत्येक कलर ऑप्शनची किंमतही वेगवेगळी आहे. बाइकची किंमत 2.06 लाखांपासून सुरू होते. ही किंमत मिस्टिक कॉपर कलर ऑप्शनची आहे. याशिवाय, मूनस्टोन व्हाइट कलरची किंमत 2.07 लाख आणि जॅस्पर रेड (डुअल टोन)ची किंमत 2.09 लाख रुपये आहे. यात फ्यूल टँकला लाल आणि पांढरा रंग लावण्यात आला आहे.
4 / 5
जावा 42 बॉबर कंपनीच्या Jawa Perak प्रमाणेच आहे. याची चेसी आणि इंजिन सारखेच आहे. परंतू, स्टाइलच्या बाबतीत, ही वेगळी आहे. कंपनीने याला वेगळा लूक देण्यासाटी इंजिन केसिंग, हेडलँप काउल आणि एग्जॉस्ट टिप्सवर क्रोम जोडले आहे.
5 / 5
यात पेराकच्या तुलनेत सस्पेंशनला आणखी आरामदायक बनवले आहे. याशिवाय, यात फुल-एलईडी लायटिंग आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरदेखील दिले आहे. जावा 42 बॉबरमध्ये 334cc इंजिन आहे, जे 30.64PS ची पॉवर आणि 32.74Nm टार्क जनरेट करतो.
टॅग्स :javaजावाMahindraमहिंद्राbikeबाईकAutomobileवाहन