शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पॉवरफुल इंजिन अन् मॉर्डन-रेट्रो लुक; Jawa Yexdi ने लॉन्च केली नवीन बाईक, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 6:30 PM

1 / 7
Jawa 42 FJ Price and Features: लोकप्रिय टू-व्हिलर कंपनी Jawa Yezdi ने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने गेल्या महिन्यातच देशांतर्गत बाजारात Jawa 42 ला अपडेट केले होते. त्यानंतर आता Jawa 42 FJ विक्रीसाठी लॉन्च करण्यात आली आहे. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत 1.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 2.20 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) असेल. ही नवीन बाईक Jawa 42 च्या तुलनेत 26,000 रुपयांनी महाग आहे. कंपनीने बाईकचे प्री-बुकिंग सुरू केले असून, कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन फक्त 942 रुपयांमध्ये बुकिंग करता येईल.
2 / 7
नवीन Jawa 42 FJ कशी आहे: कंपनी या नवीन Jawa 42 FJ ला आधुनिक-रेट्रो लुक दिला आहे. ॲल्युमिनियम प्लेट लावलेली टीयर ड्रॉप आकाराचा पेट्रोल टँक मिळेल. साइड पॅनल Jawa 42 प्रमाणेच आहे. हीच ब्रँडची ओळख असल्यामुळे यात कुठलाही बदल केलेला नाही. बाईकचा टेल लाइट्स मागील फेंडरमधून बाहेरच्या दिशेने दिले आहेत.
3 / 7
Jawa 42 FJ मध्ये मल्टी स्पोक अलॉय व्हील, ब्लॅक आउट इंजिन आणि अपस्वेप्ट एक्झॉस्ट पाईप मिळतात. यामुळे या बाईकला थोडा स्पोर्टी लुक देखील मिळतो. त्याच्या बेस मॉडेलमध्ये वायर स्पोक व्हील देण्यात आले आहेत. कंपनीने ही बाईक एकूण पाच रंगांमध्ये लॉन्च केली आहे. अरोरा ग्रीन मॅट, कॉस्मो ब्लू मॅट, मिस्टिक कॉपर, डीप ब्लॅक - रेड क्लॅड आणि डीप ब्लॅक - ब्लॅक कॅड हे रंग मिळतात. या सर्व कलर व्हेरियंटची किंमतही वेगळी आहे.
4 / 7
पॉवर आणि परफॉर्मन्स: कंपनीने या बाईकमध्ये 334 सीसी क्षमतेचे लिक्विड-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन वापरले आहे. हे इंजिन 29.1hp पॉवर आणि 29.6Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन स्लिप आणि असिस्ट क्लच तंत्रज्ञानासह 6-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. हे इंजिन नेहमीच्या Jawa 42 पेक्षा सुमारे 2hp अधिक पॉवर जनरेट करेल. एकूणच कंपनीच्या दाव्यानुसार लुक, डिझाइन आणि परफॉर्मन्सच्या आधारावर ही बाईक चांगला पर्याय ठरू शकते.
5 / 7
इतर वैशिष्ट्ये कुठली: इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, बाइकमध्ये एलईडी लाइट्स, यूएसबी चार्जिंग पोर्ट, सिंगल-पॉड, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. बाईकमध्ये स्टील चेसिसचा वापर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 41 मिमी टेलिस्कोपिक फोर्क आणि ट्विन शॉक यांसारखे सस्पेन्शन मिळतात. ब्रेकिंगसाठी समोर 320 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूसही डिस्क ब्रेक वापरण्यात आला आहे.
6 / 7
एकूण 184 किलो Jawa 42 FJ च्या सीटची उंची 790 मिमी आहे. याचा अर्थ असा की ही बाईक सरासरी उंचीच्या लोकांसाठी देखील चांगली असेल. त्याचे ग्राउंड क्लीयरन्स 178 मिमी आहे. ही बाईक नेहमीच्या Jawa 42 पेक्षा जवळपास 2 किलो वजनी आहे. या बाईकमध्ये ड्युअल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) चा मानक म्हणून समावेश करण्यात आला आहे.
7 / 7
या गाड्यांशी स्पर्धा: भारतीय बाजारपेठेत नवीन Jawa 42 FJ 350 cc सेगमेंटच्या बाइक्सशी स्पर्धा करेल. रॉयल एनफील्ड क्लासिक 350, टीव्हीएस रोनिन आणि रॉयल एनफील्ड हंटर 350 मॉडेल्सशी याची स्पर्धा असेल. कालच Royal Enfield ने नवीन Classic 350 लॉन्च केली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 1,99,500 रुपये आणि टॉप मॉडेलची किंमत 2,30,000 रुपये (एक्स-शोरूम, चेन्नई) निश्चित करण्यात आली आहे.
टॅग्स :Automobileवाहनbikeबाईक