Jeep नं सादर केली आपली पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही; पाहा कधीपासून सुरू होणार विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 12:17 IST
1 / 5Jeep Electric Car : जीपनं आपल्या पहिल्या इलेक्ट्रीक कारवरून अखेर पडदा उठवला आहे. ही एक एसयुव्ही कार आहे. तसंच या कारची विक्री पुढील वर्षापासून सुरू करण्यात येईल. या कारचा लूक कंपासप्रमाणेच आहे. यामद्ये स्टँडर्ड मॉडेलप्रमाणे ग्रिल देण्यात येणार नाही. तसंच यात ब्लॅक पॅनलचा वापर करण्यात येणार आहे.2 / 5साइड प्रोफाइलबद्दल बोलायचे झाले तर, या इलेक्ट्रीक एसयूव्हीला कारमध्ये ड्युअल टोन बॉडी पेंट मिळेल. तसेच, ते स्पोर्टी अलॉयसह उपलब्ध असेल. मागे बसणाऱ्या प्रवाशासाठी हँडलबारची पोझिशन सी पिलवर दिसेल.3 / 5जीपची पहिली इलेक्ट्रीक एसयूव्ही कार आंतरराष्ट्रीय बाजारात प्रथम सादर केली जाईल. तसंच २०२३ च्या मध्यात ही कार लाँच केली जाईल.4 / 5यामध्ये कंपनी अनेक चांगल्या फीचर्सचा वापर करू शकते, मात्र आतापर्यंत कंपनीकडून तांत्रिक बाबी उघड करण्यात आलेल्या नाहीत. एवढेच नाही तर, कंपनीने अद्याप बॅटरी बॅकअप आणि सिंगल चार्जवर ही कार किती ड्रायव्हिंग रेंज देईल याबाबतही माहिती दिलेली नाही.5 / 5या SUV कारमध्ये टेल गेट, रुफ, सर्वत्र एलईडी टेल लाइट्स आणि ब्लॅक बंपर देण्यात येतील. यामध्ये स्किड प्लेट्स वापरण्यात आल्या आहेत. दरम्यान, कंपनीनं केबिन बाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.