शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jeep Meridian Launch: Jeep ने लॉन्च केली नवीकोरी Meridian, Toyota Fortuner शी टक्कर; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:55 AM

1 / 7
Jeep Meridian Launch: इंडियन मार्केटमध्ये 7-सीटर एसयूव्ही सेगमेंट खूप लोकप्रिय होत आहे. या सेगमेंटमध्ये बजेट गाड्यांपासून लग्झरी गाड्यांपर्यंतची रेंज उपलब्ध आहे.
2 / 7
या सेगमेंटमध्ये लग्झरी गाड्यांच्या शौकीनांसाठी Toyota Fortuner सर्वात लोकप्रिय आहे. पण, आता या गाडीला टक्कर देण्यासाठी Jeep Meridian आली आहे. आज कंपनीने या गाडीची लॉन्चिंग केली.
3 / 7
Toyota Fortuner शी सामना- Jeep India 2022 ने आज भारतीय बाजारात आपली नवीन 7-सीटर एसयूव्ही लॉन्च केली आहे. ही प्रीमियम कॅटेगरीतील 3-लाइनमिड साइज एसयूव्ही आहे.
4 / 7
ही कंपनीची लोकप्रिय 5-सीटर गाडी Jeep Compass चे मोठे व्हर्जन आहे. पण, यात जीप कंपासपेक्षा अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात या Jeep Meridian चा सामना Toyota Fortuner शी असेल.
5 / 7
Jeep Meridian चे दमदार इंजिन-या Jeep Meridian एसयूव्हीमध्ये 2.0 लिटरचे दमदार डिझेल इंजिन असेल. हे इंजिन 170 bhp ची मॅक्स पॉवर आणि 350 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. या गाडीत 6-स्पीड गिअर बॉक्स देण्यात आला आहे. ही गाडी 4x4 व्हील ड्राइव्हसोबत येते.
6 / 7
Jeep Meridian मध्ये अनेक फीचर्स- कंपनीने या नवीन Jeep Meridian मध्ये अनेक फीचर्स दिले आहेत. यात 10.25 इंच इंफोटेनमेंट स्क्रीनसोबत अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी मिळेल.यासोबतच मल्टी झोन क्लायमेट कंट्रोल एसी कूलिंग, पॅनोरमिक सनरुफ, 360 डिग्री कॅमरा आणि 6 एअरबॅग असतील.
7 / 7
किती असेल किंमत?- Jeep Meridian ची खरी किंमत आज लॉन्चिंगनतर समोर येईल, पण फीचर्सवरुन याची अंदाजे किंमत समोर आली आहे. जानकारांच्या अंदाजानुसार, या गाडीची किंमत 30 लाख रुपयांपासून सुरू होईल. ही गाडी थेट Fortuner ला टक्कर देणार आहे. कंपनीने याची प्री-बुकिंग सुरू केली आहे.
टॅग्स :JeepजीपToyotaटोयोटाAutomobileवाहन