joy electric bikes 446 percent sales growth in july 2021 here is price and features detail know more
Joy च्या Electric Bikes चा बाजारात डंका; विक्रीत ४४६ टक्क्यांची वाढ, केवळ ४० पैशांत धावते बाईक By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 9:37 AM1 / 13भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक वाहनांची मागणी सातत्यानं वाढत आहे. विशेषकरून टू व्हीलर सेगमेंटमध्ये अनेकांचा रस वाढत असल्याचं दिसून आलं आहे. 2 / 13पेट्रोलच्या वाढत्या किंमती आणि सरकारकडून इलेक्ट्रीक वाहनांवर दिल्या जाणाऱ्या सब्सिडीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लोक आता इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताना दिसत आहेत. 3 / 13देशातील प्रमुख इलेक्ट्रीक दुचाकी वाहन उत्पादक कंपनी वार्डविझार्ड इनोव्हेशन अँड मोबिलिटी लिमिटेडनं घोषणा केली की त्यांच्या जॉय या इलेक्ट्रीकल ब्रान्डनं गेल्या जुलै महिन्यात सर्वात उत्तम कामगिरी केली आहे. 4 / 13कंपनी जॉय ब्रँड अंतर्गत इलेक्ट्रीक मोटरसायकल आणि स्कूटर दोन्हींची विक्री करते. एक्सप्रेस ड्राईव्हमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, कंपनीने जुलै महिन्यात एकूण 945 युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षी जुलै महिन्यात 173 युनिट्सपेक्षा 446 टक्के अधिक आहे. 5 / 13केंद्र आणि राज्य सरकारकडून इलेक्ट्रीक वाहनांना मिळणाऱ्या सबसिडी आणि मिळणारी सूट यामुळे वाहनांची विक्री अनेक पटींनी वाढली असल्याचं मत वाजविझार्ज इनोव्हेशन अँड मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य वित्तीय अधिकारी स्रेहा शौचे यांनी व्यक्त केलं.6 / 13'सातत्यानं होणारी इंधनाच्या किंमतीतील वाढ आणि जागरूकता मोहिमांमुळे वाहनांची मागणी देखील वाढली आहे. याव्यतिरिक्त, शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील अनेक लोकांसाठी इलेक्ट्रीक दुचाकी प्राधान्य बनली आहे,' असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 7 / 13सध्या कंपनी देशातील २५ शहरांमध्ये आपल्या वाहनांची विक्री करत आहे. तसंच येत्या काळात ही संख्या वाढवण्याची कंपनीची इच्छा आहे. 8 / 13जॉय ई-बाईकच्या पोर्टफोलिओमध्ये तुफान, थंडरबोल्ट आणि स्कायलाईन सारख्या अनेक हायस्पीड इलेक्ट्रीक बाईक्स आहेत. त्यांचा टॉप स्पीड 90kms प्रति तास आहे. याशिवाय कंपनी इलेक्ट्रीक स्कूटर्सचीदेखील विक्री करते. 9 / 13कंपनीची प्रसिद्ध असलेली बाईक Joy Monster मध्ये कंपनीनं 250W क्षमतेच्या BLDC इलेक्ट्रीक मोटर आणि 72V, 39 AH च्या लिथियम बॅटरी पैकचा वापर केला आहे.10 / 13 ही बाईक सर्वाधिक 25 किलोमीटर प्रति तास वेगानं धावू शकते. तसंच ही बाईक 100 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या बाईकची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी पाच ते साडेपाच तासांचा कालावधी लागतो. याची किंमत 1.56 लाख रूपये आहे.11 / 13या शिवाय कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Joy Skyline आणि Thunderbolt स्पोर्ट डिझाइनवाल्या बाईक्स आहेत. कंपनीनं यामध्ये DC हबलेस इलेक्ट्रीक मोटरचा वापर केला आहे. 12 / 13तसंच दोन्ही बाईक्स सर्वाधिक 150 किलोपर्यंत वजन घेऊ शकतात. तसंच या सिंगल चार्जमधघ्ये 110 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देतात. 13 / 13कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या बाईक्सची रनिंग कॉस्ट केवळ 40 पैसे प्रति किमी आहे. स्कायलाईन ची किंमत 2.29 लाख रुपये आणि थंडरबोल्टची किंमत 2.33 लाख रुपये इतकी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications