शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Nexon पासून Harrier पर्यंत..., टाटा कारवर मिळतोय भरघोस डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 1:04 PM

1 / 6
नवी दिल्ली : या महिन्यात टाटा मोटर्स आपल्या प्रवासी वाहनांवर भरघोस सूट देत आहे. जर तुम्हाला जुलै 2022 मध्ये टाटा कार खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी बचतीची ही उत्तम संधी आहे. कंपनी आपल्या Tiago, Tigor, Harrier, Safari आणि Nexon सारख्या मॉडेल्सवर बेनिफिट्स देत आहे. या गाड्यांवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया...
2 / 6
या कारच्या XE, XM, XT व्हेरिएंट्सच्या खरेदीवर तुम्ही 18,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. यामध्ये 10,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट, 3000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 5000 रुपयांपर्यंत व्हेंडर/एम्प्लॉई डिस्काउंट मिळत आहे.
3 / 6
जर तुम्ही या कारचे पेट्रोल व्हेरिएंट विकत घेतले तर तुम्ही या महिन्यात 8,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. टाटा नेक्सॉनच्या डिझेल व्हेरिएंटवर 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट, 10,000 रुपयांचा व्हेंडर/एम्प्लॉई डिस्काउंट मिळत आहे. म्हणजेच, डिझेल व्हेरिएंटवर तुम्ही एकूण 15,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.
4 / 6
तुम्ही टाटा अल्ट्रोजच्या पेट्रोल व्हेरिएंटच्या खरेदीवर व्हेंडर/एम्प्लॉई डिस्काउंट म्हणून 7,500 रुपयांपर्यंत बचत करू शकता. त्याचवेळी, डिझेल व्हेरिएंटवर हा डिस्काउंट 10,000 रुपयांपर्यंत आहे.
5 / 6
या कारवर 40,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट ऑफर केला जात आहे, तर कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणून तुम्ही 5,000 रुपये वाचवू शकता. याशिवाय, आपण व्हेंडर/एम्प्लॉई डिस्काउंटच्या रूपात 25,000 रुपयांची बचत करू शकता. अशाप्रकारे हॅरियरच्या खरेदीवर एकूण 70,000 रुपयांची बचत होऊ शकते.
6 / 6
आयकॉनिक टाटा सफारीवर तुम्ही 40,000 रुपयांपर्यंत बचत देखील करू शकता. ही बचत तुम्हाला एक्सचेंज बोनस म्हणून ऑफर केली जाईल.
टॅग्स :businessव्यवसायAutomobileवाहन