शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फेसलिफ्टपूर्वी Maruti Brezza वर भन्नाट ऑफर! १ लाख भरा अन् कार घरी न्या; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 10:19 AM

1 / 12
भारतीय बाजारपेठेतील स्पर्धा अधिक तीव्र होताना दिसत आहे. अनेकविध कंपन्या आपली विविध नवीन उत्पादने आक्रमकपणे लॉंच करत आहेत. यातच या स्पर्धेतील आपली आघाडी कायम ठेवण्यासाठी Maruti Suzuki कंपनीनेही कंबर कसली असून, नवीन उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात काम करत आहे.
2 / 12
मारुतीच्या अनेक कारना प्रचंड मागणी कायम असते. मात्र, सेमी कंडक्टर चीपच्या कमतरेतमुळे मारुती ग्राहकांची मागणी योग्य पद्धतीने पूर्ण करण्यास असमर्थ ठरताना दिसत आहे. याचा मोठा फटका मारुतीच्या कार विक्रीवर होताना पाहायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
3 / 12
मात्र, तरीही Maruti Suzuki कंपनी येत्या काही काळात Ertiga, XL6 या कारसह नवीन विटारा ब्रेझावर काम करत असून, लवकरच यांचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉंच होऊ शकते. याशिवाय, कंपनी एक एकदम नवीन मिड साइज एसयूव्ही तयार करत आहे.
4 / 12
सन २०१६ मध्ये मारुती सुझुकीने कमी किंमतीत शानदार लूक फीचर्सची कॉम्पॅक्ट एसयूव्ही मारुती विटारा ब्रेझा सादर केली होती. लॉंच झाल्यानंतर अल्पावधीतच ही कार प्रचंड लोकप्रिय झाली. लवकरच मारुती ब्रेझाचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉंच करणार आहेत.
5 / 12
टाटा नेक्सॉनच्या टक्करची एसयूव्ही मारुती ब्रेझा खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर कमी ईएमआयवर ही कार खरेदी करण्याची खूपच सोपी प्रोसेस आहे. तुम्ही केवळ १ लाख रुपयाचे डाउनपेमेंट करून मारुती ब्रेझा घरी घेऊन जाऊ शकता.
6 / 12
भारतात मारुती सुझुकी विटारा ब्रेझाची किंमत ७.६९ लाख रुपये (एक्स शोरूम) पासून सुरू होते. तसेच ११.३४ लाख रुपयांपर्यंत जाते. या ५ सीटर एसयूव्हीला LXi, VXi, ZXi आणि ZXi+ सारख्या ४ ट्रिम्स लेवलच्या ९ व्हेरियंट्समध्ये आणले गेले आहे.
7 / 12
Maruti ‌Brezza एसयूव्ही ५ स्पीड मॅन्यूअल सोबत ४ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन मध्ये येते. ब्रेझा १८.७६ किमी प्रति लीटर पर्यंत मायलेज देते. मारुती ब्रेझा एलएक्सआय बेस व्हेरियंट आहे. याची किंमत ७.६९ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे.
8 / 12
Maruti ‌Brezza LXI ही कार एक लाख रुपयाचे डाउनपेमेंट वर खरेदी करू शकता. तुम्हाला ७ लाख ६१ हजार ५८८ रुपये लोन मिळेल. याचे व्याज दर ९ टक्के असेल. यानंतर तुम्हाला ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला १५ हजार ८०९ रुपये ईएमआय मिळेल. एकूण लोन अमाउंटवर तुम्हाला ५ वर्षात १.८७ लाख रुपये व्याज द्यावे लागेल.
9 / 12
Maruti ‌Brezza VXI बेस मॉडलचे व्हेरियंट आहे. याची किंमत ८.८७ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. जर ब्रेझा व्हीएक्सआय एक लाख रुपयाच्या डाउनपेमेंटवर या कारला घरी घेऊन नेऊ शकता.
10 / 12
ईएमआय कॅलक्यूलेटरनुसार, ८ लाख ८० हजार ४६८ रुपये लोन मिळेल. यानंतर तुम्हाला ५ वर्षापर्यंत दर महिना ९ टक्के व्याज दरानुसार, १८ हजार २७७ रुपये ईएमआय द्यावा लागेल. एकूण लोन अमाउंटवर तुम्हाला ५ वर्षात २.१६ लाख रुपये व्याज द्यावे लागेल.
11 / 12
Maruti ‌Brezza च्या सर्व व्हेरिएंटची योग्य माहिती आणि त्यावरील ऑफर जाणून घेण्यासाठी जवळच्या मारुती सुझुकीच्या शोरुमला भेट द्यावी, असे सांगितले जात आहे. मारुतीची कार खरेदी करण्याआधी तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशीपकडे जाऊन सविस्तर माहिती करून घेऊ शकता. त्यानंतर खरेदी करू शकता.
12 / 12
अलीकडेच मारुतीने व्हॅगर आर, बलेनोचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉंच केले असून, बलोनेला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, मारुती आपल्या इलेक्ट्रिक कारवरही काम करत असून, लवकरच भारतीय बाजारात उतरवेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी