शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maruti Ertiga वर मेगा ऑफर! फक्त ९० हजार भरा अन् कार तुमची; पाहा, सर्व डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 10:09 AM

1 / 9
Maruti Suzuki कंपनी येत्या काही काळात Ertiga, XL6, Alto आणि WagonR चे अपडेटेड व्हर्जनवर काम करीत आहे. याशिवाय, नवीन विटारा ब्रेझा आणि एकदम नवीन मिड साइज एसयूव्ही तयार करत आहे. यापैकी काही कार यावर्षीच्या अखेरीस लॉंच केल्या जाऊ शकतात.
2 / 9
भारतीय बाजारपेठेतील स्पर्धा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेकविध कंपन्या आपली नवीन उत्पादने लॉंच करताना पाहायला मिळत आहेत. यातच या स्पर्धेतील आपली आघाडी कायम ठेवण्यासाठी Maruti Suzuki कंपनीनेही कंबर कसली असून, आक्रमकपणे नवीन उत्पादनांवर काम करत आहे.
3 / 9
मारुतीच्या अनेक कारना प्रचंड मागणी कायम असते. मात्र, सेमी कंडक्टर चीपच्या कमतरेतमुळे मारुती ग्राहकांची मागणी योग्य पद्धतीने पूर्ण करण्यास असमर्थ ठरताना दिसत आहे. याचा मोठा फटका मारुतीच्या कार विक्रीवर होताना पाहायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
4 / 9
भारतात ऑटोमोबाइल बाजारात एमपीव्ही सेगमेंटमध्ये बाकीच्या सेगमेंटच्या अपेक्षेपेक्षा कमी ऑप्शन आहेत. परंतु, आता अनेक कंपन्या या सेगमेंटमध्ये आपली एमपीव्ही मॉडल उतरवत आहेत.
5 / 9
आताच्या घडीला मारुती सुझुकी अर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) देशातील सर्वांत स्वस्त पॉप्यूलर एमपीव्ही आहे. या कारच्या सर्वांत स्वस्त व्हेरियंट Ertiga LXI (Petrol) ची किंमत ८.१२ लाख रुपये आहे. मात्र, या कारवर मेगा ऑफर देण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
6 / 9
Maruti Suzuki Ertiga LXI व्हेरियंटसाठी तुम्हाला ९० हजार रुपयाचे डाउन पेमेंट करावे लागेल. बाकीची किंमत तुम्ही फायनान्स करू शकता. यावर ९.८ टक्के दराने व्याज द्यावे लागेल. या व्हेरियंटसाठी तुम्हाला ८ लाख ८ हजार ८९ रुपये लोन घ्यावे लागेल. ज्यावर ९.८ टक्के व्याज दराने ५ वर्षासाठी म्हणजेच ६० महिन्यासाठी तुम्हाला १० लाख २५ हजार ४०० रुपये द्यावे लागतील.
7 / 9
म्हणजेच ५ वर्षात तुम्हाला एकूण २ लाख १७ हजार ३११ रुपये व्याज द्यावे लागेल. पुढील ५ वर्षांपर्यंत तुम्हाला दर महिना १७ हजार ९० रुपये ईएमआय द्यावा लागेल. मारुती अर्टिगा देशातील सर्वात पॉप्यूलर एमपीव्ही आहे. याची भारतात खास डिमांड आहे.
8 / 9
Maruti Suzuki Ertiga च्या काही व्हेरियंट्ससाठी खूप मोठा वेटिंग पीरियड आहे. फायनान्स केल्यानंतर तुम्ही या कारचे सर्वात स्वस्त व्हेरियंट घरी घेऊन जावू शकता.
9 / 9
Maruti Suzuki Ertiga च्या सर्व व्हेरिएंटची योग्य माहिती घेण्यासाठी जवळच्या मारुती सुझुकीच्या शोरुमला भेट द्यावी, असे सांगितले जात आहे. मारुतीची कार खरेदी करण्याआधी तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशीपकडे जाऊन सविस्तर माहिती करून घेऊ शकता. त्यानंतर खरेदी करू शकता.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी