शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केवळ ९ हजार भरा आणि घरी न्या नवी कोरी Honda Activa 6G; पाहा किती असेल EMI

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 10:47 AM

1 / 9
होंडा अॅक्टिव्हा (Honda Activa) ही भारतात अनेकांच्या आवडीची स्कूटर आहे. या गाडीची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. लोक या गाडीची किंमत, चांगलं मायलेज. जबरदस्त लूक आणि चांगल्या रिसेल व्हॅल्यूमुळे या स्कूटरकडे आकर्षित होताना आपल्याला पाहायला मिळतात.
2 / 9
अशातच तुम्हाला ही स्कूटर केवळ 9 हजार रूपयांचं डाऊनपेमेंट आणि उर्वरित रक्कम ईएमआयच्या स्वरूपात भरून घरी नेता येणार आहे. पाहूया याची अधिक माहिती आणि स्कूटरची किंमत आणि काय आहे फीचर्स.
3 / 9
Honda Activa 6G STD मॉडेलची ऑनरोड किंमत 81907 रुपये आहे. जर तुम्ही ही स्कूटर 9 हजार रुपये डाऊनपेमेंट करून विकत घेता, तर बाईक देखोच्या ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार 3 वर्षांसाठी 8 टक्के व्याजानं जर तुम्ही ही स्कूटर घेतली, तर तुम्हाला 2511 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. दरम्यान, 3 वर्षांसाठी 17,489 रुपयांचं व्याज तुम्हाला द्यावं लागेल.
4 / 9
Honda Activa 6G वर उपलब्ध असलेल्या कर्जाची रक्कम, डाउन पेमेंट आणि व्याजदर देखील तुमच्या बँकिंग आणि CIBIL स्कोअरवर अवलंबून असतील. तुमच्या बँकिंग किंवा CIBIL स्कोअरमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आल्यास बँक या तिन्हीमध्ये बदल करू शकते.
5 / 9
Honda Activa 6G मध्ये 109 CC चं BS6 इंजिन देण्यात आलंआहे. यामध्ये कार्बोरेटरच्या जागी एफआयएस टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.
6 / 9
Honda Activa 6G ही स्कूटर 8000 आरपीएमवर 7.68bhp ची पॉवर आणि 5250 आरपीएमवर 8.79 Nm चा टॉर्क जनरेट करते. हे यापूर्वीच्या 5G च्या तुलनेत थोडं कमी आहे. अॅक्टिव्हा 5G मध्ये BS4 इंजिन देण्यात आलं होतं.
7 / 9
Activa 6G मध्ये Activa 5G च्या तुलनेत 10 टक्के अधिक मायलेज मिळत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. नव्या अॅक्टिव्हामध्ये 55 ते 60 किमीचं मायलेज मिळत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
8 / 9
नवीन Activa 6G मध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आलाय. यामध्ये रिमोट हॅच ओपनिंग, मल्टी फंक्शन-की सोबत इतर फीचर्स देखील देण्यात आले आहेत. स्कूटरमध्ये एक्टर्नल फ्युअल फिलिंग कॅपही देण्यात आलीये. वन टच फ्युएल लॉक ओपनर सारखे फीचर्स या स्कूटरला कारसारखा अनुभव देतात.
9 / 9
याशिवाय, सीट उघडण्याबरोबरच ते बंद करण्यासाठी 3 मोडची सुविधा आहे. यासोबतच सीटखाली 18 लीटरची मोठी बूट स्पेस उपलब्ध आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन Activa 6G ची सीट लांब आहे. या फीचर्सशिवाय नवीन Activa 6G मध्ये कंपनीच्या HET तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
टॅग्स :Hondaहोंडाscooterस्कूटर, मोपेडMONEYपैसा