शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ट्रायबर, XL6 वर भारी पडली किआची 'ही' कार, ७ सीटर कारमध्ये ठरतेय पहिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 6:26 PM

1 / 6
सध्या देशात सेडान कार्सची मागणी कमी होत आहे. तर दुसरीकडे एसयुव्ही आणि एमपीव्ही सेगमेंटच्या कार्सची मागणी तेजीनं वाढत आहे. सहा महिन्यांपूर्वीही एमपीव्ही सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीच्या अर्टिगाचंच वर्चस्व होतं आणि सध्याही ही कार आपलं स्थान टिकवून आहे.
2 / 6
परंतु दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारलीये ती म्हणजे किआच्या कॅरेन्स या कारनं. या कारनं टोयोटालाही मागे टाकलं आहे. एमपीव्हीच्या टॉप 5 मॉडेल्सबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये एक्सएल 6, ट्रायबर, किआ कार्निव्हल आणि महिंद्रा मराझो यांचा समावेश आहे.
3 / 6
जानेवारी ते जून या कालावधीत अर्टिगाच्या 68,922 कार्सची विक्री झाली. यामध्ये सेमगेंट शेअर 40.46 टक्के इतका होता. तर कॅरेन्सच्या 30,953, इनोव्हाच्या 30,551 आणि एक्सएल 6 च्या 20,176 युनिट्सची विक्री झाली. तर यानंतर रेनोच्या ट्रायबर, किआ कार्निव्हल, महिंद्रा मराझो यांचा समावेश होतो.
4 / 6
मारुती अर्टिगामध्ये 9 इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे. यामध्ये सुझुकी स्मार्टप्ले प्रो टेक्नॉलॉजीचाही वापर करण्यात आला आहे. हे वॉईस कमांड आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. कनेक्टेड कार फीचर्समध्ये गाडीचं ट्रॅकिंग, टो अवे अलर्ट आणि ट्रॅकिंग, जिओ फेन्सिंग, ओव्हर स्पीड अलर्ट आणि रिमोट फंक्शन सामील आहे. कारमध्ये 360 डिग्री सराऊंड व्ह्यू कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीसह 1.5 लिटर नॅचरली ॲस्परेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आलेय.
5 / 6
केर्न्समध्ये 1.4-लिटर GDI पेट्रोल इंजिनची पॉवर देण्यात आली आहे, ज्यामध्ये 7-स्पीड DCT आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत. यात 1.5-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन पर्याय देखील मिळतो, जो 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केरेन्सच्या प्रत्येक मॉडेलमध्ये 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत.
6 / 6
MPV ला ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स, मागील पार्किंग सेन्सर्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, सर्व चाकांवर डिस्क ब्रेक, ESC, ABS आणि डाउनहिल ब्रेक कंट्रोल यांसारखे फीचर्सही यात देण्यात आलेत. यात Apple कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 8-स्पीकर बोस सराउंड सिस्टम आणि सनरूफ सारखेही फीचर्स मिळतात.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीRenaultरेनॉल्ट