शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kia Carens: Maruti Suzuki अर्टिगाला देणार टक्कर, या महिन्यात लॉन्च होणार Kia ची जबरदस्त गाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 3:39 PM

1 / 9
Kia India या महिन्यात आपली नवीन 6 आणि 7 सीटर MPV बाजारात आणत आहे. या जबरदस्त गाडीसाठी कंपनीने बुकिंग सुरू केले आहे. भारतीय बाजारपेठेत Kiaच्या या कारची थेट टक्कर मारुती सुझुकी अर्टिगा, इनोव्हा, क्रिस्टा सारख्या गाड्यांशी असेल.
2 / 9
अशा परिस्थितीत या Kiaच्या एमपीव्हीला चांगला खप करण्यासाठी गडीची किंमत इतर गाड्यांपेक्षा कमीच ठेवावी लागेल. कंपनीने कमी किमतीत दमदार फीचर्स दिले तर स्पर्धेमध्ये ही गाडी मोठी झेप घेईल.
3 / 9
Kia ने या महिन्यात आपली नवीन कार्नेस (Carnes) लॉन्च करणार आहे. कंपनीने आंध्रप्रदेशातील आपल्या प्लांटमधून या कारची शोरुममध्ये डिलीव्हरी सुरू केली आहे.
4 / 9
कार्नेस Kia चे भारतातील चौथे वाहन आहे. यापूर्वी कंपनीच्या Kia Seltos, Sonnet आणि Carnival ची विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे, Kia या कार्नेसचे उत्पादन फक्त भारतात करणार असून, येथूनच 80 देशांमध्ये याची निर्यात केली जाणार आहे.
5 / 9
Kia Motor India ने 14 जानेवारी पासून या कार्नेस MPV ची बुकिंग सुरु केली असून, भारतीयांचा या गाडीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बुकिंगच्या अवघ्या 24 तासांत सुमारे 8,000 कार्सची बुकिंग झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
6 / 9
6 आणि 7 सीटर आसन क्षमता असणाऱ्या या MPV ची अंदाजे किंमत 16-18 लाख रुपये असू शकते. Kia Carens ला स्पर्धेच्या अनुषंगाने किफायतशीर वाहन बनवण्यासाठी कंपनीने या गाडीत अनेक फीचर्स दिले आहेत.
7 / 9
Kia Carens सोबत उपलब्ध असलेल्या तीन इंजिन पर्यायांपैकी सर्वात मजबूत 1.4-लिटर चार-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 140 hp पॉवर आणि 6-स्पीड मॅन्युअलशी जोडलेल्या 7-स्पीड DCT गिअरबॉक्ससह येते.
8 / 9
याच्या इंटेरिअरमध्ये दोन डिजिटल डिस्प्ले मिळतात, ज्यात 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. ही प्रणाली वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह येते.
9 / 9
या एमपीव्हीच्या केबिनमध्ये प्रवाशांना भरपूर जागा मिळणार आहे. तसेच, सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्ज, हिल स्टार्ट असिस्ट, हिल होल्ड असिस्ट, टीपीएमएस आणि डिस्क ब्रेक्स चारही चाकांवर उपलब्ध असणार आहेत.
टॅग्स :AutomobileवाहनKia Motars Carsकिया मोटर्सcarकार