शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kia EV6: तब्बल 708 Km रेंज अन् 18 मिनिटांत फूल चार्ज! भारतात लवकरच 'या' EV कारचे बुकिंग सुरू...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 6:55 PM

1 / 7
Kia EV6: इलेक्ट्रीक चारचाकी घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आङे. Kia India ने आज घोषणा केली की, ते लवकरच Kia EV6 इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरू करणार आहे. आकर्षक डिझाइन आणि पॉवरफूल बॅटरी पॅकने सुसज्ज असलेली Kia EV6 गेल्या वर्षी जूनमध्ये भारतात लॉन्च झाली होती.
2 / 7
कंपनीने शेअर केलेल्या माहितीनुसार, 15 एप्रिलपासून या कारचे बुकिंग पुन्हा एकदा सुरू होत आहे आणि आता ही कार देशातील 44 शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. या प्रीमियम इलेक्ट्रिक क्रॉसओवरची किंमत 60.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने आतापर्यंत 432 युनिट्सची डिलिव्हरी केली आहे.
3 / 7
कशी आहे Kia EV6 इलेक्ट्रिक कार? Kia EV6 इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (E-GMP) वर आधारित आहे. यामध्ये, कंपनीने 77.4 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी दिली आहे, जी एका चार्जमध्ये तब्बल 708 किलोमीटरची रेंज देते. ही इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर दोन प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे. सिंगल मोटर RWD व्हर्जन 229 bhp आणि 350 Nm तर ड्युअल मोटर सेट-अपसह AWD व्हेरिएंट 325 bhp आणि 605 Nm पीक टॉर्क जनरेट करतो.
4 / 7
18 मिनिटांत 80% चार्जिंग: या इलेक्ट्रिक क्रॉसओवरची बॅटरी अल्ट्रा-फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, जी कारला 100 किमी पर्यंतची रेंज देण्यासाठी 4.5 मिनिटांत बॅटरी पुरेशी चार्ज करते. कंपनीचा दावा आहे की, या कारची बॅटरी 350 kW DC फास्ट चार्जरने फक्त 18 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होते, तर 50 kW DC चार्जरने 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी सुमारे 73 मिनिटे लागतात.
5 / 7
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर Kia EV6 मध्ये दोन मोठे 12.3-इंच वक्र डिस्प्ले देण्यात आले आहेत. यापैकी एक टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, तर दुसरी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर म्हणून दिली आहे. यामध्ये ADAS (अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम), 14-स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टीम दिली आहे. Kia EV6 ची किंमत रिअर व्हील ड्राइव्ह (RWD) व्हेरियंटसाठी 60.95 लाख रुपये आणि ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) ट्रिमसाठी रुपये 64.95 लाख (एक्स-शोरूम) आहे.
6 / 7
Kia India व्यवस्थापकीय संचालक आणि CEO Tae-Jin Park, म्हणाले, “आम्ही आमची पहिली प्रीमियम EV EV6 ला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल अत्यंत आनंदी आणि उत्साहित आहोत. या कारने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. लॉन्च झाल्यापासून ईव्हीने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. विद्युतीकरण आणि शाश्वततेबद्दलच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून, EV6 ने पहिल्याच वर्षी सर्वाधिक विक्री होणारे उत्पादन बनून इतिहास रचला आहे.”
7 / 7
22 ऑगस्ट रोजी कंपनीने भारतातील पहिला आणि सर्वात वेगवान '240kWh' चार्जर स्थापित केला. लॉन्चच्या वेळी 12 शहरांमधील 15 निवडक डीलरशिपमधून 44 शहरांमधील 60 आउटलेटपर्यंत EV डीलरची संख्या वाढवण्याची कंपनीची योजना आहे. Kia India ने सध्याच्या 15 डीलरशिपवरून सर्व 60 आउटलेट्समध्ये 150 kW हाय-स्पीड चार्जर नेटवर्कचा विस्तार करण्याची योजना आखली आहे.
टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सIndiaभारतAutomobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर