शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

KIA EV6 आली हो! सिंगल चार्जवर ५२८ किमी अन् किंमतही कळली; बुकिंग किती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 1:25 PM

1 / 13
भारतीय बाजारपेठेत सेल्टॉस आणि सोनेट सारख्या किफायतशीर पण तितक्याच प्रिमिअम लूकच्या कार लाँच करत जम बसवल्यानंतर KIA कंपनीनं आता जबरदस्त इलेक्ट्रीक कार लाँच केली आहे. KIA EV6 आज लाँच करण्यात आली.
2 / 13
KIA EV6 ची संपूर्ण माहिती आज कंपनीकडून जाहीर करण्यात आली आहे. कारच्या फिचर्स, लूक्स आणि किंमत देखील कंपनीनं जाहीर केली आहे.
3 / 13
स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित असलेल्या EV6 च्या आतील बाजूसही बऱ्यापैकी जागा देण्यात आली आहे. जबरदस्त लूक्स आणि चार रंगात कार उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
4 / 13
EV6 मध्ये दोन १२.३ इंचाच्या टचस्क्रिन इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि इन्फोटेन्मेंट सिस्टम उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इलेक्ट्रीक सनरुफ, ADAS तंत्रज्ञान, १४ स्पीकर, कनेक्टेट कार टेक आणि बरेच फिचर्स कारमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
5 / 13
सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कारमध्ये ८ एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. तसंच फॉरवर्ड कोलेजन असिस्ट, अॅडप्टीव्ह क्रूझ कंट्रोलचेही फिचर देण्यात आले आहेत.
6 / 13
हटके आणि आकर्षक डिझाइननं EV6 नं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारचा लूक आणि डिझाइन पाहाता EV6 एक परफेक्ट क्रॉसओव्हर आणि ४ डोअर कप जबरदस्त ईव्ही कार सिद्ध होत आहे.
7 / 13
EV6 कारचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही कार सिंग चार्जवर तब्बल ५२८ किमीची रेंज देऊ शकते असा दावा कंपनीनं केलं आहे. कारमध्ये 77.4kWh बॅटरी युनिट देण्यात आलं आहे. चार्जिंगबाबत बोलायचं झालं तर 50kW चार्जरनं कार ७३ मिनिटांत १० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.
8 / 13
350kW क्षमतेची चार्जिंग सुविधा उपलब्ध असेल तर कार अवघ्या १८ मिनिटांत फुल चार्ज होऊ शकणार आहे.
9 / 13
EV6 ला याआधीच ३५५ बुकिंग मिळाल्या आहेत आणि भारतात पहिल्या बॅचमध्ये १०० कार दाखल होणार आहेत.
10 / 13
EV6 मध्ये डे-टाइम रनिंग LED हेललाइट्स आणि सिक्विंटल इंडिकेटर्स असे अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कारचा फ्रंटलूक लक्ष वेधून घेतो. त्यात टायगर नोझ फ्रंट ग्रीलनं खणखणीत लूक कारला मिळाला आहे.
11 / 13
EV6 कार ब्लॅक, रेड, व्हाइट आणि सिल्वर अशा चार रंगात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
12 / 13
EV6 कारसाठी कंपनीकडून ३ वर्षांची वॉरंटी देण्यात येणार आहे. तर ८ वर्षांची बॅटरीची वॉरंटी असणार आहे.
13 / 13
KIA नं EV6 सध्या दोन व्हेरिअंटमध्ये बाजारात दाखल केली आहे. यात GT Line व्हेरिअंटची किंमत ५९.९५ लाख (एक्स-शो रुम) आणि GT Line AWD व्हेरिअंटची किंमत ६४.९५ लाख (एक्स शोरुम) अशी असणार आहे.
टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सElectric Carइलेक्ट्रिक कार