शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kia देणार Tata ला टक्कर! लॉंच होतेय पहिली इलेक्ट्रिक कार; ५१० किमी रेंज अन् सुपरफास्ट चार्जिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:04 PM

1 / 9
देशात इलेक्ट्रिक कार सेगमेंट मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक कार, बाइक यांकडे वळल्याचे पाहायला मिळत आहे. या क्षेत्रात टाटा आघाडीवर असून, लवकरच Kia मोटर्स आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे.
2 / 9
कोरियाची ऑटोमोबाइल निर्माता कंपनी किआने नुकतेच भारतात Kia EV6 नेमप्लेट ट्रेडमार्क केले आहे. कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे. जिला जगभरातील बाजारात चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.
3 / 9
आता किआची पहिली इलेक्ट्रिक कार संबंधी नवीन माहिती समोर आली आहे. ही कार भारतात जून महिन्यात लाँच केली जावू शकते. ही कार अनेक आधुनिक फीचर्स सोबत येईल, असे सांगितले जात आहे.
4 / 9
भारतात दमदार एन्ट्री घेत Kia मोटर्स अल्पवधीतच लोकप्रिय ठरलेला एक ब्रँड असून, इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये स्पर्धा वाढवण्याचे काम ही कार करेल, असा दावा करण्यात येत आहे. किआ मोटर्सने EV6 Light, EV6 Earth, EV6 Water आणि EV6 Air नावाने आपली इलेक्ट्रिक कारसाठी ट्रेडमार्क केले आहे.
5 / 9
Kia कंपनीच्या इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरला अलीकडेच अमेरिकी मार्केटमध्ये एन्ट्री झाली आहे. किआ ईव्ही ६ एक इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर आहे. ज्याला हॅचबॅक आणि एसयूव्हीचे कॉम्बो मानले जात आहे.
6 / 9
अमेरिकी मार्केटमध्ये असलेल्या Kia EV6 चा टॉप स्पीड १८८ किमी प्रति लीटरपर्यंत आहे. याला फक्त ५.१ सेकंदात शून्य ते ९६ किमी प्रति तास वेग पकडता येतो. किआ ईव्ही ६ दिसायला खूपच शानदार आहे. या कारची रेंज ५१० किमी पर्यंत असणार आहे.
7 / 9
Kia EV6 ला वेगवेगळ्या बॅटरी पॅक सोबत आणले जावू शकते. यात ५८ kWh ची बॅटरी पॅक दिली आहे. याचे इलेक्ट्रिक मोटर १६७ एचपी पर्यंत पॉवर आणि ३४९ एनएम टॉर्क जनरेट करू शकते. तर मिड रेंज आणि टॉप एन्ड व्हेरियंट्स मध्ये आणखी पॉवरफुल मोटर दिली आहे.
8 / 9
Kia EV6 मध्ये १९ इंचाचा अलॉय व्हील्स, १२.३ इंचाचे डिजिटल कन्सोल, १२.३ इंचाचा इंफोटेनमेंट सिस्टम, अडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटोमॅटिक एसी, वायरलेस चार्जिंग, स्मार्ट क्रूझ कंट्रोल, रिमोट स्मार्ट पार्किंग असिस्ट, लेवल २ हायवे ऑटोनॉमी ड्रायविंग आणि हायवे ड्रायविंग असिस्टेंस सिस्टम सह अनेक स्टँडर्ड आणि सेफ्टी फीचर्स मिळू शकतात, असे सांगितले जात आहे.
9 / 9
दरम्यान, Kia मोटर्सने आपली नवीन ७ सीटर SUV लॉंच केली आहे. ६ आणि ७ सीटर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. किआ कारन्सला इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत फक्त ८.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे.
टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर