Kia Motors: largest car launched by Kia, 11 people can comfortably seat
Kia Motors : Kia ने लॉन्च केली सर्वात मोठी कार, 11 जणांना आरामात प्रवास करता येणार By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 6:44 PM1 / 5 Kia Motors : कोरियन ऑटो जायंट किआ (Kia) ने अखेर आपली नेक्स्ट जनरेशन कार्निव्हल MPV सादर केली आहे. KA4 असे कोड नेम या गाडीला दिले आहे. ही कार्निव्हल एमपीवीचे अॅडव्हान्स व्हर्जन असेल. विशेष म्हणजे, Kia ची ही नवीन एमपीवी जुन्या मॉडेलपेक्षा मोठी दिसत आहे. 2 / 5 याचे इंटीरिअर खूप स्पेशियस दिसून येतोय. यात 11 लोकांना आरामात बसण्याची जागा असेल. या MPV चे डिझाइन आणि फीचर्स ग्राहकांना खूप पसंत येईल. कंपनीने याला पूर्वीपेक्षा अधिक अपडेट केले आहे. कंपनी लवकरच या नवीन MPV ची किंमत जाहीर करेल. 3 / 5 किआने पहिल्यांदा 2020 ऑटो एक्सपोमध्ये भारतीय बाजारात कार्निव्हल MPV लॉन्च केली होती. गेल्या तीन वर्षात या लक्झरी एमपीवीला किरकोळ अपडेट मिळाले आहेत. कार्निव्हल 2023 किंवा kA4 एमपीवी याचे 4th जेन मॉडेल आहे. यात मल्टी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, रिअर ऑक्यूपेंट अलर्ट, ड्युअल सनरुफसारखे फीचर्स पाहायला मिळतात. 4 / 5 Kia KA4 अॅडव्हांस्ड ड्रायव्हर अॅड्स सिस्टीम (ADAS) ने सूसज्ज आहे. यात रिमोट स्मार्ट पार्किंग असिस्ट, लेन फॉलोइंग असिस्ट, फॉरवर्ड कोलिशन-एवॉयडेंस असिस्ट (FCA) आणि ब्लाइंड-स्पॉट अवॉइडेंस असिस्ट (BCA) सारखे इतर फीचर्सदेखील आहेत. याशिवाय, Kia ने यात वायरलेस चार्जिंग, एक मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील आणि एक 12.3 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीमदेखील दिला आहे. 5 / 5 कियाने KA4 शिवाय, EV9 कॉन्सेप्टलाही सादर ेले आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्ही कॉन्सेप्टने नोव्हेंबर 2021 मध्ये लॉस एंजिल्स ऑटो शोमध्येही दाखवण्यात आले होते. EV9 कॉन्सेप्टची लांबी 4,930 मिमी, रुंदी 2,055 मिमी, उंची 1,790 मिमी असून, यात 3,100 मिमीचा व्हीलबेस पाहायला मिळेल. EV9 कॉन्सेप्टदेखील Kia EV6 प्रमाणे ऑल-इलेक्ट्रिक प्लेटफॉर्मवर बेस्ड असेल. आणखी वाचा Subscribe to Notifications