kia motors to launch soon new electric car kia ev6 in india with 500km range and amazing features
Kia आणतेय नवी EV6! ५०० किमीची रेंज अन् भन्नाट फिचर्स; Tata, MG ला देणार तगडी टक्कर By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 7:26 PM1 / 9भारतात एन्ट्री घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत Kia मोटर्सचा मोठा दबदबा निर्माण झाला. देशातील अनेक कंपन्यांना धोबीपछाड देत, Kia च्या अनेक कार लोकप्रिय ठरल्या. भारतातील कंपनीचा आलेख दिवसेंदिवस चढाच राहिला. 2 / 9आगामी भविष्य हे इलेक्ट्रिक कारचे आहे, हे ओळखून अनेकविध कंपन्यांनी आपली आगामी उत्पादने इलेक्ट्रिक प्रकारात सादर करण्याचे ठरवले आहे. आताच्या घडीला भारतातीलही इलेक्ट्रिक कारचे मार्केट मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. TATA मोटर्स या सेगमेंटमध्ये अव्वल असून, ह्युंदाई, एमजी मोटर्स यांसारख्या कंपन्यांच्या कार उपलब्ध आहेत. 3 / 9यातच आता या कंपन्यांना तगडी टक्कर देण्यासाठी Kia मोटर्सने कंबर कसली असून, लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक कार EV6 ही भारतात लॉंच करू शकते, अशी माहिती देण्यात आली आहे. यासाठी किआ मोटर्सने EV6 Light, EV6 Earth, EV6 Water आणि EV6 Air नावाने आपली इलेक्ट्रिक कारसाठी ट्रेडमार्क केले आहे. 4 / 9Kia कंपनीकडून अद्याप यासंदर्भात स्पष्ट पुष्टी करण्यात आलेली नाही. इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरला मागील महिन्यात अमेरिकी मार्केटमध्ये एन्ट्री झाली आहे. किआ ईव्ही ६ एक इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर आहे. ज्याला हॅचबॅक आणि एसयूव्हीचे कॉम्बो मानले जात आहे. 5 / 9अमेरिकी मार्केटमध्ये असलेल्या Kia EV6 चा टॉप स्पीड १८८ किमी प्रति लीटरपर्यंत आहे. याला फक्त ५.१ सेकंदात शून्य ते ९६ किमी प्रति तास वेग पकडता येतो. किआ ईव्ही ६ दिसायला खूपच शानदार आहे. या कारची रेंज ५०० किमी पर्यंत असणार आहे. 6 / 9Kia EV6 ला वेगवेगळ्या बॅटरी पॅक सोबत आणले जावू शकते. यात ५८ kWh ची बॅटरी पॅक दिली आहे. याचे इलेक्ट्रिक मोटर १६७ एचपी पर्यंत पॉवर आणि ३४९ एनएम टॉर्क जनरेट करू शकते. तर मिड रेंज आणि टॉप एन्ड व्हेरियंट्स मध्ये आणखी पॉवरफुल मोटर दिली आहे.7 / 9Kia EV6 मध्ये १९ इंचाचा अलॉय व्हील्स, १२.३ इंचाचे डिजिटल कन्सोल, १२.३ इंचाचा इंफोटेनमेंट सिस्टम, अडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटोमॅटिक एसी, वायरलेस चार्जिंग, स्मार्ट क्रूझ कंट्रोल, रिमोट स्मार्ट पार्किंग असिस्ट, लेवल २ हायवे ऑटोनॉमी ड्रायविंग आणि हायवे ड्रायविंग असिस्टेंस सिस्टम सह अनेक स्टँडर्ड आणि सेफ्टी फीचर्स मिळू शकतात, असे सांगितले जात आहे. 8 / 9दरम्यान, Kia मोटर्सने आपली नवीन ७ सीटर SUV लॉंच केली आहे. ६ आणि ७ सीटर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. किआ कारन्सला इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत फक्त ८.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. 9 / 9Kia मोटर्सची Seltos, Carnival आणि Sonnet नंतर Kia Carens ही भारतातील चौथी कार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications