शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kinetic ने लॉन्च केली नवीन EV स्कूटर 'Zulu', 104Km अन् किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 5:23 PM

1 / 6
Kinetic Zulu: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळेच बाजारपेठेत सतत नवनवीन मॉडेल्स दाखल होताहेत. यातच आता Kinetic Green ने अधिकृतपणे आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Kinetic Zulu देशांतर्गत बाजारात लॉन्च केली आहे. आकर्षक लुक आणि पॉवरफुल बॅटरी पॅकने सुसज्ज असलेल्या या स्कूटरची सुरुवातीची किंमत 94,900 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपद्वारे ही स्कूटर बुक करता येईल.
2 / 6
कंपनीचा दावा आहे की Kinetic Zulu इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे 'मेड इन इंडिया' आहे. पुढील वर्षापासून या स्कूटरची डिलिव्हरी सुरू होईल. बाजारात ही इलेक्ट्रिक स्कूटर प्रामुख्याने Ola आणि Ather सारख्या ब्रँडच्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक प्रगत फीचर्स आणि टेक्नॉलॉजीचा समावेश केला आहे.
3 / 6
लुक आणि डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने कायनेटिक झुलूमध्ये एलईडी हेडलॅम्प, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, डिजिटल स्पीडोमीटर, ऑटो कट चार्जर आणि साइड स्टँड सेन्सरसारखे फीचर्स दिले आहेत. स्कूटरचा स्टँड खाली असेल तर इन्स्ट्रुमेंट कन्सोलमधील लाईटद्वारे अलर्ट दिला जाईल. याशिवाय स्कूटरच्या अंडरसीट स्टोरेजमध्ये लाइटही देण्यात आला आहे.
4 / 6
कंपनीचा दावा आहे की या स्कूटरचा ग्राउंड क्लीयरन्स 160 mm आहे, ज्यामुळे याला जवळपास सर्व प्रकारच्या रस्त्यावर सहज चालवता येते. या स्कूटरची लांबी 1,830 मिमी, उंची 1,135 मिमी आणि रुंदी 715 मिमी आहे. त्याचा व्हीलबेस 1,360 मिमी आणि वजन 93 किलो आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची पेलोड क्षमता 150 किलो आहे.
5 / 6
Kinetic Zulu मध्ये 2.27 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी दिली आहे, जी सिंगल चार्जवर 104 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. ही स्कूटर 2.1 kW BLDC इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज आहे आणि तिचा टॉप स्पीड 60 किमी प्रति तास आहे. कंपनीचे म्हणणे आहे की या स्कूटरची बॅटरी सामान्य 15-amp घरगुती सॉकेटद्वारे चार्ज केली जाऊ शकते. विशेष म्हणजे ही बॅटरी अवघ्या अर्ध्या तासात 80 टक्के चार्ज होते.
6 / 6
उत्तम राइडिंग आणि परफॉर्मन्ससाठी या स्कूटरला पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि मागील बाजूस ड्युअल शॉक अॅब्जॉर्बर देण्यात आला आहे. यात पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक आहेत. हाय स्पीडमध्येही ब्रेक लावल्यावर संतुलित ब्रेकिंग मिळते. ही स्कूटर प्रामुख्याने बाजारात असलेल्या Ola S1 आणि Ather 450S सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहनbikeबाईकscooterस्कूटर, मोपेड