शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tata ला टक्कर द्यायला मारुती सज्ज! CNG सोबत येतेय Swift आणि Dzire; लाँचिंगपूर्वी डिटेल्स लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 5:24 PM

1 / 9
पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असून, देशातील इंधनदर सार्वकालिक उच्चांकावर आहेत. याला पर्याय म्हणून CNG आणि इलेक्ट्रिक कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अलीकडेच टाटा ग्रुपच्या टाटा मोटर्सने CNG चा पर्याय असलेल्या दोन कार लाँच केल्या.
2 / 9
टाटाच्या या कारना चांगला प्रतिसाद भारतीय ग्राहक देताना दिसत आहेत. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून टाटाची विक्रीही दणक्यात सुरू आहे. त्यामुळे आता टाटाला टक्कर देण्यासाठी मारुती सुझुकी सज्ज झाली आहे. आपल्या बेस्ट सेलिंग दोन कारचे CNG मॉडेल मारुती लाँच करणार आहे.
3 / 9
Maruti Suzuki देशातील सर्वांत मोठी कार निर्माता कंपनी असून, देशातील सीएनजी मार्केटवर कंपनीचा दबदबा आहे. Maruti Suzuki Swift CNG आणि Maruti Suzuki Dzire CNG ची उत्सूकता ग्राहकांना खूप आधीपासून आहे. काही दिवसांपूर्वी या दोन्ही कार संबंधी नवीन अपडेट समोर आले.
4 / 9
देशातील ऑटो कंपन्यांनी याआधी अनेक व्हेरियंटच्या सीएनजी कार भारतात लाँच केल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत या कारची किंमत स्वस्त आणि जास्त मायलेज मिळत असल्याने ग्राहकांचा या कार खरेदीला मोठा रिस्पॉन्स मिळत आहे.
5 / 9
भारतात ऑटोमोबाइल बाजारात सीएनजी व्हेइकर सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीचा मार्केट शेअर सर्वाधिक आहे. यानंतर आता ह्युंदाई कंपनीही यामध्ये जम बसवण्यावर भरत देत आहे. इतकेच नाही, तर विश्वास वाढलेल्या टाटानेही CNG पर्यायातील मॉडेल उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
6 / 9
टाटाने या सेगमेंट मध्ये टियागो आणि टिगोरला उतरवले आहे. आता ग्राहकांना टाटा पंच सीएनजीची उत्सुकता लागून राहिली आहे. टाटा पंचला देशभरात शानदार प्रतिसाद मिळाला आहे. सीएनजी कारच्या डिमांडमध्ये मोठी वाढ होत आहे.
7 / 9
भारतात स्विफ्ट आणि डिझायर या दोन्ही कारचा एक मोठा वर्ग आहे. या दोन्ही गाड्यांची मोठी डिमांड आहे. आता कंपनी या दोन्ही कारला सीएनजी व्हर्जन मध्ये आणत आहे. या कारच्या लाँचिंग संबंधी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
8 / 9
या दोन्ही कार आता सीएनजीच्या पर्यायात उपलब्ध होऊ शकतात, असा कयास बांधला जात आहे. carspy.shots यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
9 / 9
मारुतीच्या या दोन कारचे CNG मॉडेल लाँच झाल्यानंतर या सेगमेंटमधील स्पर्धा आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीTataटाटा