शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Car AC Care Tips: कारमध्ये व्हायचंय थंडगार तर 'या' गोष्टींवर नक्की करा विचार; AC कुलिंगच्या भन्नाट टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 4:24 PM

1 / 9
कारमध्ये एसी (AC) हे महत्त्वाच्या फीचर्सपैकी एक आहे. भारतात बहुतांश ठिकाणी गरम वातावरणाचा अनुभव येतो. त्यामुळे अनेकदा आपण कार चालवताना एसी सुरू ठेवतो. कारमध्ये एसी असणं जसं महत्त्वाचं आहे, तसं त्यात कुलिंगही चांगलं असणं तितकंच महत्त्वाचं आहे.
2 / 9
एसीच्या माध्यमातून कारमध्ये जास्तीत जास्त कुलिंग होण्यासाठी तुम्हाला मदत करतील अशा टीप्स, युक्त्या आणि हॅक्सबद्दल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही कारची काळजी कशाप्रकारे घेता यावरही अवलंबून असतं.
3 / 9
उन्हाळ्याच्या दिवसांत तुमची कार थंड ठेवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमची कार सावलीत उभी करा. तुम्ही तुमची कार सावलीत उभी केल्यास, ती उन्हामुळे जास्त गरम होईल याची काळजी करण्याची गरज नाही. सूर्यप्रकाशात कार गरम होतो, त्यामुळे कारमध्ये बसण्यापूर्वी किंवा ड्रायव्हिंग सुरू करण्यापूर्वी ती थंड होईपर्यंत तुम्हाला थांबावे लागेल. सावलीत पार्किंग केल्याने तुमच्या कारच्या पेंट सुरक्षेसह तुम्हाला अन्यही फायदे मिळतात.
4 / 9
जर तुम्हाला सावलीत जागा सापडत नसेल, तर तुम्ही खिडकी उघडी ठेवू शकता जेणेकरून ताजी हवा गाडीत येईल. यामुळे तुम्हाला गाडीमध्ये कमी गरम होईल. याशिवाय तुम्ही सनशेड्स खरेदी करू शकता आणि वापरू शकता, जे सूर्यप्रकाश तुमच्या कारमध्ये जाण्यापासून रोखतील.
5 / 9
जर तुमच्या गाडीला सनरुफ असेल तर ते तुमच्यासाठी अतिरिक्त बेनिफिट ठरेल. जर तुमच्या कारला सनरुफ असेल तर तुम्ही ते उघडू शकता. यामुळे तुमच्या कारमधील गरम हवा बाहेर जाईल. जर तुम्ही सुरूवातीलाच जास्त स्पीडनं एसी सुरू केला तर कार लवकर थंड होते, असा समज आहे. परंतु तो चुकीचा आहे.
6 / 9
सुरूवातीला एसी कमी स्पीडवर ठेवल्यास तुम्हाला चांगलं कुलिंग मिळेल. जेव्हा तुम्ही कारमध्ये बसता तेव्हा वाहनाच्या आतील तापमाम बाहेरच्या तापमानापेक्षा अधिक असतं. जर तुम्ही ब्लोअरला अधिक वेगानं सेट केलं तर एसीवर केबिन थंड करण्यासाठी अधिक जोर पडेल. जर तुमच्या कारमध्ये ऑटो एसी सिस्टम असेल, तर ते कमी स्पीडमध्ये सुरू होतात. तसंच जर तुमच्या कारमध्ये मॅन्युअल एसी असलेली कार असेल तर त्यांनाही ऑटो एसीप्रमाणे तुम्ही कंट्रोल करू शकता.
7 / 9
एसीमधून थंड हवा येऊ लागल्यानंतर री-सर्क्युलेशन मोड सुरू करा. याचा अर्थ एसी सिस्टीम बाहेरील हवा खेचणार नाही आणि केबिनमध्ये आधीच असलेल्या हवेचा वापर करेल. सिस्टमवर जास्त जोर न येता हे केबिन थंड ठेवण्यास मदत करेल.
8 / 9
जेव्हा तुम्ही आपल्याला हवे असलेल्या ठिकाणी पोहोचाल तेव्हा इंजिन बंद करण्यापूर्वी एसी बंद करा. तुम्ही पंखा काही वेळ सुरू ठेवू शकता.
9 / 9
तुमच्या कारचा AC एक केबिन फिल्टरसह सुसज्ज आहे जो केबिनमध्ये हवा येण्यापूर्वी करण्यापूर्वी ती फिल्टर करतो. केबिन फिल्टरमध्ये धूळ असू शकते. त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स आणि कुलिंगवरही परिणाम होते. तुमच्या कारचा एसी चांगला ठेवण्यासाठी तुम्ही ही गोष्ट स्वतःही करू शकता. फक्त फिल्टर काढा आणि नियमितपणे स्वच्छ करा.
टॅग्स :Automobileवाहनcarकार