Greta Electric Scooters : अडीच तासांत फुल चार्ज, १०० किमीची रेंज; लाँच झाली स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रीक स्कूटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 15:45 IST
1 / 6Greta Electric Scooters ने भारतीय बाजारात Greta Glide नावाची नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत अन्य सामान्य स्कूटर्सप्रमाणेच आहे.2 / 6या स्कूटरची विशेष बाब म्हणजे विशेष म्हणजे फुल चार्ज केल्यावर 100 किमी पर्यंतची रेंज देते. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रीक स्कूटर फास्ट चार्जिंग लिथियम-आयन बॅटरीद्वारे 2.5 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण चार्ज होते.3 / 6कंपनीने या स्कूटरचे बुकिंग सुरू केले आहे. यासोबतच ग्राहक बाय-नाऊ ऑफरचाही लाभ घेऊ शकतात. ऑफर अंतर्गत, प्री-बुक केलेल्या स्कूटरवर 6,000 रुपयांची सूट आणि स्पॉट बुक केलेल्या स्कूटरवर 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे.4 / 6ही स्कूटर यलो, ग्रे, ऑरेंज, स्कार्लेट रेड, रोज गोल्ड, कँडी व्हाइट आणि जेट ब्लॅक या सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय कंपनी 3 वर्षांची बॅटरी वॉरंटीदेखील देत आहे.5 / 6ग्रेटा ग्लाइड इलेक्ट्रीक स्कूटर बर्याच परफॉर्मन्स आणि सेफ्टी फीचर्ससह येते. फीचर्सच्या यादीमध्ये DRL, EBS, ATA सिस्टम आणि स्मार्ट शिफ्टचा समावेश आहे. स्कूटर रिव्हर्स ड्राइव्ह मोड आणि थ्री-स्पीड ड्राइव्ह मोडला देखील सपोर्ट करते. याशिवाय या स्कूटरमध्ये 3.5-इंचाचे रुंद ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.6 / 6ग्रेटा ग्लाइडच्या इतर फीचर्समध्ये एलईडी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले, कीलेस स्टार्ट, अँटी थेफ्ट अलार्म, फ्रंट ग्लोव्ह बॉक्स, लाईट डिझायनर कन्सोल आणि 'एक्स्ट्रा-लार्ज' लेग रूम यांचा समावेश आहे. याशिवाय फाइंड माय व्हेईकल अलार्म, ब्लॅक लेदरेट सीट कव्हर आणि यूएसबी पोर्ट देखील देण्यात आले आहेत. या स्कूटरची किंमत 80,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.