know how to apply online for driving license in just 10 steps you can apply pay 350 rupees
Driving License तयार करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही; घरबसल्या होणार काम By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 11:28 AM1 / 15सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. 2 / 15अशा परिस्थितीत अनेक कामांना विलंब होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला तुमचा Driving License तयार करायचा असेल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे.3 / 15आता तुम्हाला Driving License घरबसल्याही बनवता येणं शक्य आहे.4 / 15यासाठी तुम्हाला केवळ ३५० रूपये इतके खर्च अपेक्षित आहे. तसंच बाहेर न जात घरबसल्या तुम्हाला तुमच्या लायसन्सचं कामही करता येईल.5 / 15तुम्हाला केवळ या १० स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा Driving License तयार करू शकता.6 / 15ऑनलाईन Driving License साठी तुम्हाला परिवहन विभागाची वेबसाईट https://parivahan.gov.in/ यावर क्लिक करावं लागेल.7 / 15यानंतर होम पेजवर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस आणि त्यानंतर ड्रायव्हिंग रिलेटेड सर्व्हिसेसवर क्लिक करावं लागेल.8 / 15त्यानंतर जे पेज उघडेल त्यावर तुम्ही राहत असलेल्या राज्याचं नाव सिलेक्ट करा.9 / 15त्यानंतर तुमच्या समोर एक नवं पेज ओपन होईल. त्याठिकाणी असलेल्या अनेक ऑप्शन्सपैकी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. 10 / 15ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अॅप्लिकेशन सबमिट असा ऑप्शन दिसेल. 11 / 15यापूर्वी तुम्हाला तुमची सर्व माहिती भरावी लागे. तसंच जी काही माहिती विचारली असेल ते योग्यरित्या तपासून भरावी लागेल. 12 / 15यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितलं जाईल. 13 / 15ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला फोटो आणि तुमची सही अपलोड करावी लागेल.14 / 15त्यानंतर तुम्हाला शुल्क भरण्यास सांगितलं जाईल. त्या ठिकाणी योग्यरित्या शुल्क भरण्याची प्रोसेस पूर्ण करावी लागेल.15 / 15शुल्क भरल्यानंतर तुम्हा शुल्क भरल्याची पावती मिळेल. ती डाऊनलोड करून प्रिंट करा अथवा तुमच्याकडे सांभाळून ठेवा. आणखी वाचा Subscribe to Notifications