शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मस्तच! Komaki ची सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक बाइक लाँच; एका चार्जवर १०० किमी धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 5:33 PM

1 / 10
गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहने उत्पादन, विक्री आणि वापरास सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. एकीकडे पेट्रोल, डिझेल यांचे दर वाढत आहेत. तर दुसरीकडे प्रदुषणाचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.
2 / 10
या पार्श्वभूमीवर हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे. भारतात अनेक कंपन्या त्यांची इलेक्ट्रिक वाहने लाँच करताना दिसत आहेत. इलेक्ट्रिक सायकल, इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक कारनंतर आता इलेक्ट्रिक बाइकही काही कंपन्यांकडून सादर केल्या जात आहेत.
3 / 10
दिल्लीमधील इलेक्ट्रिक टू व्हीलर मेकर Komaki ने आता इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी याच कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती. (new cheapest electric motorcycle)
4 / 10
२०२१ मधील ईव्ही उत्पादक कोमाकी कंपनीचे हे चौथे उत्पादन आहे. कोमाकीने नवीन MX3 इलेक्ट्रिक बाइक भारतात लाँच केली आहे. कोमाकी कंपनीकडून दावा करण्यात आला आहे की, MX3 बाइक एकदा चार्ज केल्यानंतर १०० कि.मी.पर्यंत धावेल.
5 / 10
तुमची रायडिंग स्टाईल कशी आहे, यावर या MX3 बाइकचे मायलेज अवलंबून आहे, असेही कंपनीने सांगितले आहे. खर्चाच्या दृष्टीने ही “पॉकेट फ्रेंडली” बाइक आहे, असल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.
6 / 10
MX3 पूर्णपणे चार्ज होण्यासाठी १-१.५ युनिटपेक्षा जास्त उर्जा वापरत नाही. या बाइकची बॅटरी सोयीस्करपणे चार्ज करता यावी, यासाठी यामध्ये रीमुव्हेबल Li-ion बॅटरी देण्यात आली आहे.
7 / 10
Komaki MX3 अनेक अत्याधुनिक सुविधांसह सादर करण्यात आली आहे. तसेच गार्नेट रेड, डीप ब्लू आणि जेट ब्लॅक या तीन रंगात ही इलेक्ट्रिक बाइक सादर करण्यात आली आहे.
8 / 10
Komaki MX3 मध्ये सेल्फ डायगनॉसिस अँड रिपेयर स्विच, रिजेनरेटिव्ह डुअल डिस्क ब्रेकिंग, पार्किंग आणि रिव्हर्स असिस्ट, एक इनबिल्ट ब्लूटूथ स्पीकर, 3-स्पीड मोड आणि एक फुल कलर LED डॅशचा समावेश आहे.
9 / 10
Komaki MX3 मध्ये १७ इंची अ‍ॅलोय व्हील्स, टेलिस्कोपिक शॉक अ‍ॅब्सॉर्बर, अलोय व्हील्स, फ्रंट हेडलॅम्प्स आणि टेल लॅम्पवर हॅलोजन, ब्लिंकर आणि एलईडी युनिट देण्यात आले आहेत.
10 / 10
Komaki MX3 ची एक्स शोरूम किंमत ९५ हजार रुपये आहे. याव्यतिरिक्त, Komaki ने भारतात TN95, SE आणि M5 इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सदेखील सादर केल्या आहेत. दरम्यान, पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही.
टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनbikeबाईकtechnologyतंत्रज्ञानAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग