शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

KTM 890 Adventure R बाइक पाहिलीत का? कारपेक्षाही दमदार इंजिन अन् जबरदस्त फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 1:01 PM

1 / 7
KTM India ने अखेर KTM 890 Adventure R स्पोर्ट्स बाईक इंडिया बाइक वीक 2022 मध्ये शोकेस करण्यात आली.
2 / 7
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बाईकमध्ये 889cc पॅरलल-ट्विन इंजिनची पावर असेल असा अंदाज आहे. म्हणजेच या इंजिनची तुलना मारुती सुझुकी ALto 800 कारच्या इंजिनशी केली जाऊ शकते. पण ही बाईक अद्याप लॉन्च करण्यात आलेली नाही. ती फक्त इंडिया वीकमध्ये शोकेस करण्यात आली होती.
3 / 7
नव्या KTM बाईकचे इंजिन Alto 800 पेक्षा जास्त पावरफुल आहे. Alto 800 ला 796 cc इंजिन पावर मिळते, तर KTM 890 Adventure R 889 cc इंजिन पावरने सुसज्ज आहे. हे इंजिन 8,000 rpm वर 104 bhp आणि 6,500 rpm वर 100 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. ही स्पोर्ट्स बाईक ६-स्पीड गिअरबॉक्ससह येते, ज्याच्या खाली एक स्टील ट्यूब फ्रेम दिली आहे. (फोटो: केटीएम)
4 / 7
2023 मध्ये KTM 890 Adventure R, Xplor PDS म्हणजेच प्रोग्रेसिव्ह डॅम्पिंग सिस्टम रीअर शॉक कोणत्याही लिंकेजशिवाय देण्यात आला आहे. त्याचवेळी WP USD फोर्क्स समोर आणि WP सोर्स मोनोशॉक मागील बाजूस उपलब्ध आहेत.
5 / 7
पुढील आणि मागील दोन्ही युनिट्स अॅडजस्टेबल आहेत. नवीन अॅडव्हेंचर बाईक उंचावलेले हँडलबार, नकल गार्ड्स, फ्लॅट सीट आणि अपस्वेप्ट एक्झॉस्ट या वैशिष्ट्यांसह येते. (फोटो: केटीएम)
6 / 7
KTM 890 Adventure R च्या इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात ट्रॅक्शन कंट्रोल, राइड मोड्स आणि ABS सह विविध रायडिंग एड्स मिळतात. 2023 मॉडेलसाठी दुसऱ्या अपग्रेडमध्ये टॉगल स्विचसह नवीन TFT स्क्रीन दिसेल जी वेगवेगळ्या राइडिंग मोड आणि इतर सेटिंग्जसाठी वापरली जाऊ शकते. याशिवाय मोटारसायकलमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीही देण्यात आली आहे. (फोटो: केटीएम)
7 / 7
KTM 890 Adventure R मध्ये व्हर्टिकल स्टॅक केलेले एलईडी हेडलॅम्प आणि एक लांब विंडस्क्रीन देण्यात आली आहे. रायडरच्या सुरक्षिततेसाठी स्पोर्ट्स बाईकमध्ये स्वतंत्र हँडलबार गार्ड आणि बेली पॅन आहे. तसंच ही मोटरसायकल इंडिया बाइक वीक 2022 मध्ये सादर करण्यात आली आहे. एकदा लॉन्च झाल्यानंतर ही बाईक ट्रायम्फ टायगर 900 आणि डुकाटी मल्टीस्ट्राडा V2 सारख्या सारख्यांना स्पर्धा करेल. (फोटो: केटीएम)
टॅग्स :bikeबाईकauto expoऑटो एक्स्पो 2020