KTM 990 Duke: Good news for sports bike lovers! KTM Launches Powerful 990 Duke, See Features
स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खुशखबर! KTM ने लॉन्च केली शक्तिशाली 990 Duke, पाहा फीचर्स... By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 6:29 PM1 / 5 KTM 990 Duke Unveiled: KTM च्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. कंपनीने EICMA 2023 मध्ये नवीन 990 Duke बाईक लॉन्च केली आहे. ही बाजारात 890 Duke ची जागा घेईल. नवीन 990 Duke ही कंपनीच्या प्रोडक्ट लाईनअपमध्ये मिडलवेट मोटरसायकल असेल. ही नवीन बाईक आली तरीदेखी, 790 ड्यूक अजूनही विक्रीसाठी उपलब्ध असेल. 2 / 5KTM 990 Duke चे डिझाईन-नवीन KTM 990 Duke चा सर्वात आकर्षक भाग म्हणजे या बाईकची डिझाईन. 990 ड्यूकमध्ये एक अनोखे हेडलाइट डिझाइन देण्यात आले आहे. हेडलाइट्सवर चार डीआरएल आहेत. चार DRL मध्ये एक पोकळ डिझाईन आहे. बाईकमध्ये मोठे, टोकदार टँक शोडर्सदेखील आहेत. ही नवीन फ्रेमवर आधारित आहे.3 / 5केटीएम 990 ड्यूक इंजिन-बाईकची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्याचे इंजिन. या बाइकमध्ये 947cc पॅरलल ट्विन इंजिन आहे, जे 123bhp आणि 103Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकमध्ये मानक म्हणून बाय-फन्ग्शनल क्विकशिफ्टर दिले आहेत, तर इलेक्ट्रॉनिक एड्सचीही मोठी यादी आहे.4 / 5KTM 990 Duke चे इलेक्ट्रॉनिक्स-नवीन 990 ड्यूकमध्ये तीन राइड मोड, व्हीली कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, स्विच करण्यायोग्य एबीएस, लॉन्च कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल आहेत. नवीन 390 ड्यूक प्रमाणेच सर्व फीचर्स डाव्या स्विचगियरवरुन मिळतात.5 / 5केटीएम 990 ड्यूक हार्डवेअर-नवीन 990 ड्यूकमध्ये WP-निर्मित USD फोर्क्स, मागील बाजूस मोनोशॉक, 17-इंच व्हील्स, ब्रिजस्टोन S22 टायर, चार-पिस्टन फ्रंट ब्रेक कॉलर, LED लायटिंग, मागील ब्लिंकर्समध्ये टेललॅम्प आणि 5-इंच TFT डॅशबोर्ड आहे. या बाईकची किंमत अद्याप समोर आलेली नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications