शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Electric Bikes सेगमेंटमध्ये मध्ये नव्या भिडूची एन्ट्री; लवकरच लाँच होणार KTM Duke Electric

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 3:27 PM

1 / 7
KTM Duke Electric : सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel) वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर लोक अन्य पर्यायांच्या शोधात आहेत. सध्या दुचाकीमध्ये अनेक इलेक्ट्रीक बाईक्स लाँच होत आहेत. तर दिग्गज प्लेअर्सही आता इलेक्ट्रीक बाईक्सच्या उत्पादनात उतरताना दिसतायत.
2 / 7
दरम्यान, आता KTM देखील या रेसमध्ये सामील होणार आहे. KTM ब्रँड अंतर्गत पहिली इलेक्ट्रीक मोटरसायकल (Electric Bike) बहुधा इलेक्ट्रीक ड्यूक किंवा ई-ड्यूक या नावानं येण्याची शक्यता आहे. याशिवाय ती याच वर्षी लाँच केली जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
3 / 7
ऑस्ट्रियन मोटरसायकल ब्रँड KTM ची मूळ कंपनी Pierer Mobility नं पूर्णपणे इलेक्ट्रीक मोटरसायकल विकसित करत असल्याचीही पुष्टी केली आहे. या इलेक्ट्रीक बाईकची केटीएम ब्रँड अंतर्गत विक्री करण्यात येणार आहे.
4 / 7
केटीएम सध्या फुल इलेक्ट्रीक केटीएंम ड्युक (Fully-electric KTM Duke) विकसित करत आहे. मोटरसायकल डॉट. कॉमनं यासंदर्भातील माहितीही दिली आहे.
5 / 7
रिपोर्ट्सनुसार ड्युकच्या या इलेक्ट्रीक बाईकमध्ये E-Pilien बॅटरीचा वापर केला जाईल आणि ड्युक आपलं तंत्रज्ञान E-Pilen सोबत शेअर करेल.
6 / 7
अपकमिंग ग्रीन ड्युकमध्ये 5.5kWh ची फिक्स्ड बॅटरी मिळेल. या बॅटरीच्या मदतीनं मोटरसायकलला 10kW ची बॅटरी मिळेल. ही 13.4bhp ची पॉवर जनरेट करु शकते.
7 / 7
ही ड्युक बाईक एक एन्ट्री लेव्हल बाईक असू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. केटीएम ड्युक ही याशिवाय एक परवडणारी मोटरसायकल असेल. याशिलाय यात मीडियम किंवा स्मॉल साईज बॅटरी मिळण्याचीही शक्यता आहे.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbikeबाईक