शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

KTM RC 200 : अपडेटेड इंजिनसह नवीन मॉडेल लॉन्च, जाणून घ्या शानदार बाईकची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 10:03 AM

1 / 6
केटीएम इंडियाने (KTM India) OBD2 सिस्टमसह 2023 KTM RC 200 चे नवीन व्हर्जन लॉन्च केले आहे. कंपनीने OBD2 सिस्टीमसह बाईकची पूर्ण-फेअर रेंज अपडेट केली आहे.
2 / 6
भारतात उत्सर्जनाचे नवीन नियम लागू झाले आहेत. याचे पालन करण्यासाठी, अनेक ऑटो कंपन्यांनी त्यांची लाइनअप अपडेट केली आहे. KTM ने RC 200 चे नवीन मॉडेल देखील लॉन्च केले आहे. शानदार बाईकला OBD2 सिस्टमसह अपडेट करण्यात आली आहे.
3 / 6
KTM च्या नवीन बाईकमध्ये पूर्वीप्रमाणेच 199 cc सिंगल सिलिंडर लिक्विड कूल इंजिनची पॉवर मिळेल. ही बाईक 6 स्पीड गिअरबॉक्ससह येते. 2023 KTM RC 200 च्या नवीन मॉडेलमध्ये एलईडी लाईट्स देण्यात आले आहेत. हेडलाइट, टेललाइट आणि टर्न इंडिकेटरवर एलईडी मिळणार आहे.
4 / 6
बाईकचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एलसीडी आहे आणि सहलीशी संबंधित विविध माहिती दाखविते. हे डिस्टेंट-टू-एम्पिटी, गियर इंडिकेटर आणि रिअल-टाइम फ्यूल एफिशिएंसी यासारखी माहिती देईल. लेटेस्ट बाईकमध्ये ड्युअल-चॅनल ABS आहे. याशिवाय, रिअर ABS ला ऑफ केला जाऊ शकतो.
5 / 6
2023 च्या अवतारमध्ये स्टाइलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मोठ्या हेडलॅम्पसह अॅग्रेसिव्ह फ्रंट अद्याप कायम ठेवण्यात आला आहे. KTM RC 200 ला एक लहान विंडस्क्रीन मिळते, ज्यामुळे ते एकंदर वायुगतिकीय स्वरूप देते. ही बाईक मेटॅलिक सिल्व्हर आणि डार्क गॅल्व्हानो कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.
6 / 6
KTM RC 200 ला 43mm अपसाइड-डाउन एपेक्स फ्रंट फोर्क आणि 10-स्टेप प्रीलोड अॅडजस्टेबल रिअर मोनोशॉक मिळेल. 2023 KTM RC 200 बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.17 लाख रुपये आहे. बाईकची थेट स्पर्धा यामाहा YZF-R15 शी होईल, ज्याची किंमत रु. 1.96 लाख (एक्स-शोरूम)आहे.
टॅग्स :Automobileवाहनbikeबाईक