latest news now use volkswagen taigun on rent these cities are offering benefits
आता 'रेंट'वर घेऊनही चालवू शकाल Volkswagen ची नवी एसयूव्ही 'Taigun'; वाचा किती असेल भाडं By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 12:30 PM1 / 7Volkswagen Taigun Subscription Plan: एखादी कार आपल्याला घेणं शक्य नसलं तरी ती कधी चालवून पाहण्याची आपल्याला इच्छा असते. अनेकदा खिशावर पडणाऱ्या आर्थिक भारामुळे आपण कार विकत घेऊ शकत नाही. परंतु सध्या भारतातही वाहनं भाड्यानं घेऊन किंवा सबस्क्रिप्शन बेस्ड प्रोग्राम अंतर्गत घेऊन वापरण्याची प्रथा सुरू झाली आहे. 2 / 7दरम्यान, जर्मनीची कंपनी Volkswagen नं यासंदर्भात पाऊल उचलत नुकतीच लाँच झालेली Taigun ही एसयूव्हीसाठी या ऑफरची घोषणा केली आहे. नुकतीच कंपनीनं ही कार लाँच केली होती. याची किंत 10.49 लाख रूपये एक्स शोरूम इतकी निश्चित करण्यात आली आहे.3 / 7या सबस्क्रिप्शन मॉडेलद्वारे Volkswagen Taigun ची डायनॅमिक लाइन (Dynamic Line) आणि परफॉर्मन्स लाइनमधून (Performance Line) जीटी प्लस मॉडेल ऑफर करेल. कंपनीच्या पहिल्या टप्प्यात दिल्ली एनसीआर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू आणि चेन्नई येथील ग्राहकांना हा प्लॅन उपलब्ध होईल. 4 / 7फोक्सवॅगनने पुष्टी केली आहे की वाहने सबस्क्रिप्शन पॅकेजद्वारे ऑफर केली जातील ज्यात पांढरी नंबर प्लेट असेल. सध्या, सात शहरांमधील 30 फोक्सवॅगन आउटलेट्स Taigun साठी सबस्क्रिप्शन योजना ऑफर करतील.5 / 7सबस्क्रिप्शन मॉडेलद्वारे, ग्राहक दरमहा एक नवीन फोक्सवॅगन टायगुन भाड्याने घेऊ शकतात यासाठी किमान दर 28,000 रुपये इतका आकारला जाईल. या रकमेमध्ये ओएआयएस (ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस लिमिटेड) द्वारे फायनॅन्स, मेन्टेनन्स आणि विम्याचा समावेश असेल.6 / 7ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार 24, 36 आणि 48 महिन्यांच्या कालावधीसाठी सदस्यता निवडता येईल. यासाठी ग्राहकांकडे अपग्रेड करणं अथवा परत करण्याचे पर्यायही उपलब्ध असतील.7 / 7“ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या मुख्य उद्देशाने, आम्ही फोक्सवॅगनमध्ये आमच्या ओमनी-चॅनेल मोबिलिटी ऑफरसाठी काम केले आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या मालकीच्या मॉडेलची निवडीचा पर्याय देणं उद्दीष्ट आहे,” अशी प्रतिक्रिया फॉक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांनी दिली. आणखी वाचा Subscribe to Notifications